राज्यसभेवरून मविआत नाराजीनाट्य? पवारांना उमेदवारी ठाकरे नाराज?

Rajya Sabha Politics: राज्यसभेसाठी शरद पवारांनी उमेदवारी अर्ज भरला... मात्र उमेदवारी अर्ज भरताना आदित्य ठाकरे अनुपस्थित राहिल्यानं ठाकरेसेनेत पवारांच्या उमेदवारीवरून नाराजी असल्याची चर्चा रंगलीय... मात्र खरचं आदित्य ठाकरे नाराज आहेत का? ठाकरेसेना कोणाच्या उमेदवारीसाठी आग्रही होती? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये....
Sharad Pawar files nomination for Rajya Sabha as speculation rises over Aaditya Thackeray’s absence
Sharad Pawar files nomination for Rajya Sabha as speculation rises over Aaditya Thackeray’s absenceSaam Tv
Published On

मविआनं राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची घोषणा केली...त्यामुळे मविआत ऑल इज वेल सुरु आहे, असं बोललं जात होतं...मात्र ठाकरेसेनेच्या एका कृतीमुळे राज्यसभेच्या उमेदवारीवरून नाराजी आहे का असं प्रश्न पडलाय..त्याचं कारण आहे आदित्य ठाकरेंची अनुपस्थिती... राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्य़ा दिवशी मविआकडून शरद पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सुप्रिया सुळेंसह काँग्रेस नेतेही उपस्थित राहिले... मात्र आदित्य ठाकरेची अनुपस्थिती यावेळी चर्चेचा विषय ठरली..खर तर आदित्य ठाकरे सुरुवातीपासूनच राज्यसभेची उमेदवारी ठाकरेसेनेला मिळावी यासाठी आग्रही होते.

ठाकरेसेनेला मोठा भाऊ म्हणत आदित्य ठाकरेंनी राज्यसभेच्या जागेवर दावा ठोकलेला असला तरी मविआतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानं आदित्य ठाकरे नाराज असल्याची चर्चा रंगली होती....मात्र आदित्य ठाकरेंच्या अनुउपस्थितीबद्दल आणि ठाकरेसेनेच्या भूमिकेबद्दल सुप्रिया सुळेंसह ठाकरेसेनेनेही स्पष्टीकरण दिलयं....

राज्यसभेची उमेदवारी हातून गेल्यावर विधानपरिषदेसाठी ठाकरेसेना नेमकी काय भूमिका घेणार... काँग्रेसला राज्यसभा आणि ठाकरेसेनेला विधानपरिषद देण्य़ाची तयारी दाखवणारी काँग्रेस आता विधानपरिषदेत ठाकरेसेनाला पाठिंबा देणार का? विधानपरिषदेच्या जागेवरूनही भविष्यात दावे-प्रतिदावे होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com