IPL 2024 Point Table After DC VS GT (Delhi Capitals Vs Gujarat Titans):  Saam TV
Sports

IPL 2024 Point Table Updated: दिल्लीचा गुजरातला धोबीपछाड! पॉईंट टेबलमध्ये मोठी झेप; प्लेऑफची चुरस वाढली

IPL 2024 Point Table After DC VS GT (Delhi Capitals Vs Gujarat Titans): रोमहर्षक सामन्यात दिल्लीने अखेरच्या चेंडूवर गुजरात संघावर मात केली. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत मोठी झेप घेतली असून गुजरात संघाची घसरण झाली आहे.

Gangappa Pujari

IPL 2024 Latest Standing After DC VS GT Match

क्रिकेटमध्ये सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरू आहे. काल आयपीएलचा ४० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्समध्ये पार पडला. या रोमहर्षक सामन्यात दिल्लीने अखेरच्या चेंडूवर गुजरात संघावर मात केली. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत मोठी झेप घेतली असून गुजरात संघाची घसरण झाली आहे.

अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ४ गड्यांच्या मोबदल्यात 224 धावा केल्या होत्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सला 20 षटकात 8 विकेट गमावत 220 धावा करण्यात आल्या. या विजयानंतर दिल्लीचा संघ आता आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

तसेच या पराभवानंतर गुजरात टायटन्सला पराभवाचा सामना करावा लागला असून त्यांची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. नऊ सामन्यांत चार विजय आणि पाच पराभवानंतर दिल्ली आणि गुजरातचे गुणतालिकेत प्रत्येकी 8 गुण आहेत. पण उत्तम नेट रनरेटमुळे दिल्लीने गुजरातला मागे टाकत सहावे स्थान गाठले आहे. दिल्लीचा निव्वळ दर -0.386 झाला आहे तर तो -0.974 होता.

पॉईंट टेबलमध्ये कोण वरचढ?

पॉईंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल कोलकाता नाईट रायडर्स 10 गुण आणि 1.206 रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद 10 गुण आणि 0.914 नेट रनरेटसह तिसऱ्या, लखनौ सुपर जायंट्स 10 गुण आणि 0.148 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्स 8 गुण आणि 0.415 नेट रनरेटसह पाचव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड शहरात ठाकरे सैनिकांनी एकत्र साजरा केला जल्लोष

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

SCROLL FOR NEXT