

कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला
14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
अग्निशमन दलकडून 12 विद्यार्थी व शिक्षिका रेस्क्यू
विकास मिरगणे, साम टीव्ही
नवी मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरणेच्या सेक्टर २, प्लॉट नंबर १२ येथील विद्याभवन सोसायटीत गुरुवारी सायंकाळी सुमारे ५.२० वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या तळमजल्यावर घरगुती क्लास सुरु होता. त्याचवेळी पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
स्लॅब कोसळल्याची घटना घडल्यानंतर स्थानिकांची एकच धावाधाव झाली. या घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाने तत्काळ बचावकार्य हाती घेत मलब्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. अग्निशमन विभागाने एकूण 12 विद्यार्थी आणि 1 शिक्षिका अशा एकूण 13 जणांना सुरक्षित बाहेर काढलं. यापैकी चार ते पाच विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रुग्णालयात दाखल केलेला जखमी मनिष राहुल म्हसे या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनिषचा मृत्यू झाल्याची माहिती वाशी मनपा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रेस्क्यू करण्यात आलेल्यांची नावे :
सिद्धांत गुप्ता (वय 8)
प्रिन्स सोनी (वय 11)
आयशा
कुसुम (वय 15)
निष्का धनवाडे (वय 14)
आराध्या बोडसे (वय 14)
तन्वी श्रीवास्तव (वय 7)
देवांश पुजारी (वय 12)
राजदीप वानखेडे (वय 10)
पार्थ खैरनार (वय 14)
रुद्र येलूरकर (वय 5)
शिक्षिका शामली चौधरी (वय 53)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.