अजित पवारांच्या मृत्यूला महिना उलटला... मात्र त्यानंतरही संशयाचं धुकं काही कमी व्हायला तयार नाही... रोहित पवारांनी VSR कंपनी आणि डीजीसीएच्या भुमिकेवर प्रश्नांची सरबत्ती केली... यानंतरही AAIB ने दिलेल्या अहवालात VSR ला क्लीन चिट दिलीय.. मात्र हा अहवालच संशयास्पद असल्याचा आरोप करत दादांच्या आमदारांनी तटकरेंच्या अनुपस्थितीत देवगिरीवर सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. याच घटनेनं राष्ट्रवादीच्या गोटातील हालचालींना वेग आलाय..
दुसरीकडे दोन्ही सभागृहाच्या आमदारांनी एकत्रित मुख्यमंत्र्यांना भेटून दादांच्या अपघाताची सगळ्या बाजूंनी चौकशी करण्याची मागणी केली, असं म्हणत तटकरेंनी राष्ट्रवादीतील भेटीगाठीच्या हालचालींना दुजोरा दिलाय..
खरं तर दादांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देत अनेक सवाल उपस्थित केले... एवढंच नाही तर डीजीसीएने व्हीएसआर कंपनीवर ठपका ठेवल्यानंतरही कंपनीवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला होता.. मात्र आता सीआयडी अॅक्शन मोडवर आलीय.. सीआयडीनं व्हीएसआर कंपनीच्या व्ही के सिंह यांच्यासोबत कंपनीचे काही अधिकारी, कर्मचारी यांची सुद्धा चौकशी सुरु केलीय..
विशेष म्हणजे विमान अपघाताच्या संदर्भात CIDकडून VSR कंपनीला प्रश्नावली देत बुकींग कुणी केलं, वैमानिक कुणी नेमले याचाही माहिती विचारली आहे... आता एका बाजूला राज्य सरकारने नेमलेली सीआयडीच्या चौकशीला गती आलीय.. तर दुसरीकडे दादांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीच्या मागणीचं पत्र दिलंय.. त्यामुळे दादांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होणार का? आणि राष्ट्रवादीच्या आमदारांसह राज्यातील नागरिकांच्या मनातील संशयाचं धुकं दूर होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.