दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ४ रन्सनी विजय मिळवला. राशीद खानने केलेल्या फटकेबाजीमुळे एकवेळ हातातून सुटलेल्या सामन्यात संघाने पुन्हा कमबॅक केला होता, मात्र अखेरच्याक्षणी दिल्लीने बाजी मारली. दिल्लीकडून कर्णधार ऋषभ पंतने नाबाद ८८ धावा करत दिल्लीच्या विजयात मोठं योगदान दिलं.
दिल्लीच्या विजयात कर्णधार ऋषभ पंतचं मोठं योगदान राहिलं, त्याने 88 धावांची नाबाद खेळी केली. पंतने 8 षटकार आणि 5 चौकार ठोकले. अक्षर पटेलने 66 आणि ट्रिस्टन स्टब्सने 7 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. गुजरातकडून डेव्हिड मिलर आणि साई सुदर्शन यांनी उत्कृष्ट अर्धशतके झळकावली. सुदर्शनने 65 धावांची खेळी केली. डेव्हिड मिलरने 55 धावा केल्या. शेवटी राशिद खानने 11 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अयशी ठरला.
गुजरात टायटन्सला शेवटच्या षटकात 19 धावांची गरज होती. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने मुकेश कुमारला अखेच षटक दिलं. राशिद खानने मुकेश कुमारच्या पहिल्या दोन चेंडूंवर चौकार ठोकत सामन्यात पुन्हा जीव आणला. मात्र यानंतर मुकेश कुमारने सलग दोन डॉट बॉल टाकत दिल्लीला दिलासा दिला. मात्र त्यानंतर राशिद खानने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकत सामना पु्न्हा रोमहर्षक बनवला. गुजरातला शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती मात्र मुकेश कुमारने डॉट फेकत दिल्लीला विजय मिळवून दिला. या षटकातील 3 डॉट बॉल्समुळे गुजरातच्या हातून सामना निसटला.
गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्याचा फायदा घेत दिल्लीच्या संघाने फलंदाजी सुरू केली, पण सुरुवात खराब राहिली. कर्णधार ऋषभ पंत आणि अक्षर पटेलने दिल्लीचा डाव सावरत दिल्लीच्या धावफलकावर २२४ धावा लावल्या. दिल्लीची सुरुवात खराब झाली. अवघ्या ३६ धावात दिल्लीने तीन विकेट गमावल्या होत्या. पण कर्णधार आणि ऑलराउंडर अक्षर पटेलने दिल्लीचा डाव सावरला. ऋषभ पंत आणि अक्षर पटेलने अर्धशतकं झळकावत संघाला एक मोठीा धावसंख्या उभारून दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.