IPL Final 2024 kkr vs srh  saam tv
Sports

KKR vs SRH, IPL 2024 Final: IPL फायनलवर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास कसा लावला जाईल निकाल?

KKR vs SRH, Weather Update: आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे. दरम्यान हा सामना रद्द झाल्यास कसा लावला जाईल निकाल

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी शानदार खेळ करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही संघ आयपीएलची ट्रॉफी उंचावण्यासाठी जोर लावताना दिसून येतील. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे. त्यामुळे या सामन्यात पाऊस पडल्यास कसा लावला जाईल निकाल? जाणून घ्या.

या सामन्यात पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. कारण या सामन्याच्या पूर्व संध्येलाही पावसाने थैमान घातलं. त्यामुळे या सामन्यातही पाऊस हजेरी लावू शकतो. या सामन्यासाठी बीबीसीआयने राखीव दिवसाची घोषणा केली आहे. दरम्यान सामन्याच्या दिवशी अतिरिक्त १२० मिनिटांचा वेळ दिला जाईल. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील फायनलचा सामनाही पावसामुळे धुतला गेला होता. त्यावेळी हा सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला होता.

तर कोलकाता नाईट रायडर्स होणार विजेता

या सामन्यासाठी राखीव दिवस असणार आहे. मात्र राखीव दिवशीही सामना होऊ शकला नाही तर, मग कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजेता घोषित केलं जाईल. कारण कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

फायनलमध्ये रंगणार सुपर ओव्हरचा थरार?

या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरनेही लावला जाऊ शकतो. क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळावा म्हणून बीसीसीआय पूर्ण जोर लावताना दिसून येऊ शकते. मात्र जर दोन्ही दिवशी पाऊस पडला तर, नाईलाजाने कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजेता घोषित केलं जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : सुरज चव्हाणांचं प्रमोशन, दादांना पत्ताच नाही! अजित पवारांचा पक्ष हायजॅक?

SCROLL FOR NEXT