Kolkata Knight Riders: यंदा KKR पटकावणार IPL 2024 स्पर्धेची ट्रॉफी! असा आहे योगायोग

IPL 2024: यावेळी कोलकाता नाईट रायडर्सचा संघ जेतेपदावर नाव कोरु शकतो. दरम्यान कसा आहे योगायोग, जाणून घ्या.
Shreyas iyer and gautam gambhir connection of winning ipl trophy for kolkata knight riders amd2000
Shreyas iyer and gautam gambhir connection of winning ipl trophy for kolkata knight riders amd2000yandex

Kolkata Knight Riders, IPL 2024:

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. या संघाने विजयाची हॅट्ट्रिक केली असून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या शानदार कामगिरीनंतर गौतम गंभीरवर देखील कौतुकाचा वर्षाव केला जातोय. या कामगिरीचं श्रेय गौतम गंभीरला देताना दिसून येत आहेत. यादरम्यान श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर यांच्यातील एक कनेक्शन समोर आलं आहे. काय आहे ते खास कनेक्शन? जाणून घ्या.

गंभीरच्या नावे २ जेतेपदांची नोंद..

कोलकाता नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत २ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. हे दोन्ही जेतेपदं गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळताना पटकावली आहेत. २०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळण्यापूर्वी गौतम गंभीरने दिल्ली कॅपिटल्स संघाचं प्रतिनिधित्व केलं. २०१० मध्ये दिल्लीचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नव्हता. २०११ मध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या संघात स्थान दिलं. त्याच्यावर १४.९ कोटींची बोली लावली गेली. पुढच्याच हंगामात त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाला जेतेपद जिंकून दिलं. असंच काहीसं चित्र श्रेयस अय्यरबाबत पाहायला मिळालं आहे. (Cricket news in marathi)

Shreyas iyer and gautam gambhir connection of winning ipl trophy for kolkata knight riders amd2000
IPL 2024, Points Table: पंजाबच्या विजयाने गुणतालिकेत मोठी उलथापालथ! या २ संघांना मोठा धक्का

श्रेयस अय्यर अन् गौतम गंभीर कनेक्शन...

गौतम गंभीरप्रमाणेच श्रेयस अय्यर देखील आधी दिल्लीकडून खेळायचा. २०१८ मध्ये गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर श्रेयस अय्यरकडे दिल्लीची जबाबदारी सोपवण्यात आली. २०२१ पर्यंत तो दिल्लीचा कर्णधार होता.

त्यानंतर त्याला रिलीज करण्यात आलं. २०२२ मध्ये झालेल्या लिलावात तो कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. गंभीर प्रमाणेच त्याला संघाचं कर्णधार बनवण्यात आलं. योगायोग म्हणजे कोलकाताचा संघ देखील प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नव्हता.

Shreyas iyer and gautam gambhir connection of winning ipl trophy for kolkata knight riders amd2000
Shubman Gill Statement: हातचा सामना निसटल्यानंतर शुभमन गिल भडकला! पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ तुफान फॉर्ममध्ये आहे. सुरुवातीचे ३ सामने जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. आता योगायोग तर जुळला आहे. मात्र श्रेयस अय्यर गौतम गंभीरप्रमाणेच कमाल करून दाखवणार का? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com