Gautam Gambhir On Virat Kohli: 'आमची भांडणं फक्त मैदानात..',विराटबाबत गंभीरचं मन जिंकणारं वक्तव्य; Video पाहायलाच हवा

Gautam Gambhir- Virat Kohli: सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय, हा व्हिडिओ पाहुन तुम्ही गंभीरचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
 virat kohli gautam gambir
virat kohli gautam gambirgoogle

Gautam Gambhir Statement:

विराट कोहली (Virat kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) हे दोघेही भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहेत. मात्र आयपीएल स्पर्धेदरम्यान हे दोघेही खेळाडू अनेकदा आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले आहे.

आयपीएल २०१५ स्पर्धेदरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. त्यानंतर आयपीएलच्या गेल्या हंगामातही नवीन हल हक आणि विराट यांच्यातील वाद सुरु असताना गौतम गंभीर मध्ये पडला होता.

त्यामुळे विराटचे फॅन्स गंभीरवर टीका करताना दिसून आले होते. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय, हा व्हिडिओ पाहुन तुम्ही गंभीरचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर विराट कोहलीबाबत चर्चा करताना दिसून येत आहे. या व्हिडिओत अँकर गौतम गंभीरला विचारतो की,'विराटने आपल्या वनडे कारकिर्दीतील ५० वं शतक कोणत्या गोलंदाजाविरुद्ध खेळताना पूर्ण केलं होतं?' या प्रश्नाचं उत्तर देत गंभीर म्हणतो की,'लॉकी फर्ग्युसन... हे तुम्ही पुन्हा पुन्हा दाखवा की मला सर्वकाही लक्षात राहतं. आमची भांडणं केवळ मैदानावर आहेत.'

नेहमी टीका करणाऱ्या गंभीरने विराटबाबत काहीतरी सकारात्मक म्हटलं आहे. हे पाहुन नेटकरीही भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. विराटने आपल्या वनडे कारकिर्दीतील ५० वे शतक वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत पूर्ण केले होते. स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात विराटने ११३ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने आपलं शतक पूर्ण केलं होतं. (Latest sports updates)

 virat kohli gautam gambir
Suryakumar Yadav Injury: टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी! सूर्यकुमार यादवच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट आली समोर

असा राहिलाय विराटचा रेकॉर्ड..

विराटच्या शतकांबद्दल बोलायचं झालं तर त्याने सचिनचा वनडेत सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. विराटने १११ कसोटी सामन्यांमध्ये २९, २९२ वनडे सामन्यांमध्ये ५० आणि ११५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १ शतक झळकावलं आहे. विराट कोहली हा सचिननंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज आहे.

 virat kohli gautam gambir
IND vs SA, Test Series: ईशान किशनने कसोटी मालिकेतून माघार का घेतली? धक्कादायक कारण आलं समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com