SRH vs RR, Qualifier 2: पराभवानंतर राजस्थानला मोठा धक्का! संघातील स्टार खेळाडूवर BCCI ची मोठी कारवाई

Shimron Hetmyer Fined By BCCI: क्लालिफायर २ चा सामना राजस्थान आणि हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रंगला. या सामन्यानंतर राजस्थानच्या स्टार खेळाडूवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
SRH vs RR, Qualifier: पराभवानंतर राजस्थानला मोठा धक्का! संघातील स्टार खेळाडूवर BCCI ची मोठी कारवाई
SRH vs RR Qualifier 2 saam tv

आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर २ च्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. हा सामना जिंकून राजस्थान रॉयल्सला फायनलमध्ये जाण्याची संधी होती. मात्र हा सामना राजस्थान रॉयल्सला गमवावा लागला आहे. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना शिमरोन हेटमायर स्वस्तात माघारी परतला. तो अवघ्या ४ धावा करत माघारी परतला. दरम्यान बाद होऊन मैदानाबाहेर जात असताना त्याने असं काही केलं, ज्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

हेटमायरने या सामन्यात आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याच्या मॅच फी वर १० टक्के दंड आकारला आहे. त्याच्यावर कारवाई का करण्यात आली, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, बाद झाल्यानंतर त्याने ज्याप्रकारची रिअॅक्शन दिली त्यावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. १४ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या अभिषेक शर्माने त्याला क्लिन बोल्ड करत माघारी धाडलं. बाद झाल्यानंतर तो निराश दिसून आला. दरम्यान रागात तो स्टम्पला पायाने उडवणार होता.

SRH vs RR, Qualifier: पराभवानंतर राजस्थानला मोठा धक्का! संघातील स्टार खेळाडूवर BCCI ची मोठी कारवाई
SRH vs RR, IPL 2024: मैदानाबाहेर असलेल्या या दिग्गजाचा 'मास्टरप्लान' राजस्थानवर पडला भारी; पॅट कमिन्सचा खुलासा

बीसीसीआयची कारवाई

आयपीएलकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस रिलीझमध्ये लिहिले आहे की, ' राजस्थान रॉयल्स संघातील शिमरोन हेटमायरने सनरायझर्स हैदराबाविरुद्ध झालेल्या सामन्यात आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्याच्या मॅच फी वर १० टक्के दंड आकारण्यात आला आहे. हेटमायरने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत लेव्हलता १ चा गुन्हा केला आहे. त्याने हा गुन्हा मान्य केला आहे.'

या सामन्यात शिमरोन हेटमायरने ४ चेंडूंचा सामना करत केवळ १० धावा केल्या. या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर राजस्थान रॉयल्सने नाणेफेत जिंकला आणि सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकअखेर ९ गडी बाद १७५ धावा केल्या.

SRH vs RR, Qualifier: पराभवानंतर राजस्थानला मोठा धक्का! संघातील स्टार खेळाडूवर BCCI ची मोठी कारवाई
T20 World Cup 2024: IPL ला रामराम करणाऱ्या दिनेश कार्तिकवर ICC ने सोपवली मोठी जबाबदारी

राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७६ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला २० षटकअखेर ७ गडी बाद १३९ धावा करता आल्या. हा सामना राजस्थान रॉयल्स संघाला ३६ धावांनी गमवावा लागला आहे. तर सनरायझर्स हैदराबादने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com