T20 World Cup 2024: IPL ला रामराम करणाऱ्या दिनेश कार्तिकवर ICC ने सोपवली मोठी जबाबदारी
आयसीसी टी -२० वर्ल्डकप सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या १ जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीकडून समालोचकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यात रवी शास्त्री, नासिर हुसेन, इयान स्मिथ, मेल जोन्स, हर्षा भोगले आणि इयान बिशपसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यासह नुकताच आयपीएलला रामराम करणाऱ्या दिनेश कार्तिकचा देखील या यादीत समावेश करण्यात आला आहे. दिनेश कार्तिकने यापूर्वीही समालोचकाची भूमिका पार पाडली आहे.
आयसीसीने केली घोषणा
आयसीसीने एक प्रेस रिलीज शेअर करत समालोचकांची यादी जाहीर केली आहे. ज्यात त्यांनी लिहिले की, ' रवी शास्त्री, नासिर हुसे, इयान स्मिथ, मेल जोन्स, हर्षा भोगले आणि इयान बिशप सारखे दिग्गज खेळाडू समालोचन पथकाचं नेतृत्व करताना दिसून येतील. यासह या संघात दिनेश कार्तिक, एबोनी रेनफोर्ड-ब्रेंट, सॅम्युएल बद्री, कार्लोस ब्रैथवेट, स्टीव्ह स्मिथ, आरोन फिंच आणि लिसा स्थलेकरसारखे माजी महिला आणि पुरुष वर्ल्डकपविजेते खेळाडू देखील असणार आहेत.
इंग्लंड,भारत आणि ऑस्ट्रेलियासह पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंचाही समालोचन पथकात समावेश करण्यात आला आहे. ज्यात रमीज राजा आणि वसीम अक्रम यांचा समावेश असणार आहे. यासह रिकी पाँटिंग, सुनील गावस्कर, मॅथ्यू हेडन, टॉम मुडी हे दिग्गज देखील समालोचन करताना दिसून येणार आहेत.
आयपीएल स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा
आयपीएल २०२४ स्पर्धेत दिनेश कार्तिकची बॅट चांगलीच तळपली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडला. मात्र या संघाला प्लेऑफमध्ये पोहचवण्यात दिनेश कार्तिकने मोलाची भूमिका बजावली आहे. नेहमीप्रमाणे त्याने फिनिशरची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली. या हंगामात त्याला १५ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने १८७ च्या स्ट्राईक रेटने ३२६ धावा चोपल्या आहेत. ८३ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.