ipl auction 2025 auction update franchises want player retention to go from 4 to 8 players in upcoming auction yandex
Sports

IPL 2025 AuctionL: IPL मध्ये रिटेन खेळाडूंची संख्या वाढणार? ठेवता येणार इतके खेळाडू

IPL 2025 Auction Update: आयपीएल स्पर्धेचा क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेच्या आयोजनाबाबत १६ एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती

Ankush Dhavre

IPL Auction Update:

आयपीएल स्पर्धेचा क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेच्या आयोजनाबाबत १६ एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयपीएल स्पर्धेतील संघमालक आणि बीसीसीआयचे अधिकारी सहभाग घेणार होते. मात्र ही बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे. फ्रेंचायजीच्या मालकांनी ४ ऐवजी ८ खेळाडूंना रिटेन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र बीसीसीआय यासाठी तयार नसल्याचं म्हटलं जात आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार,अहमदाबादमध्ये १६ एप्रिल रोजी होणारी मिटींग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक केव्हा होणार याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. आयपीएलच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ही मिटींग पुढे ढकलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. आगामी हंगामात काय काय बदल होणार, किती खेळाडूंना रिटेन केलं जाणार या सर्व विषयांवर चर्चा होणार होती. (Cricket news in marathi)

आयपीएलच्या नियमांनुसार, एका संघात जास्तीत जास्त ४ खेळाडूंना संघात कायम ठेऊ शकतो. दरम्यान कुठलाही संघ ३ पेक्षा जास्त भारतीय खेळाडू किंवा २ परदेशी खेळाडूंना संघात कायम ठेऊ शकतो. यासह दोन अनकॅप्ड खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची मर्यादा आहे.

जर संघात ८ खेळाडूंना कायम ठेवण्याची अनुमती दिली गेली तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आणखी मजबूत होऊ शकतात. कारण हे संघ मजबूत आहेत. जर संघात ८ खेळाडूंना कायम ठेवण्याची अनुमती दिली गेली,तर या संघातील प्रमुख खेळाडू संघात कायम राहतील. इतर संघ पाहिले, तर त्या संघांकडे असे ८ खेळाडू नाहीत ज्यांना रिटेन करता येईल. त्यामुळे संघात नवे खेळाडू घ्यावे लागतील. आता बीसीसीआय हा नियम लागु करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT