ipl 2024 auction saam tv news
Sports

IPL Player Earnings: कोट्यवधींची बोली लागणाऱ्या IPL खेळाडूंना इनहॅन्ड किती मिळतात?

How Much Plyer Earns In IPL: आयपीएल खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागते. मात्र खेळाडूंना इनहॅन्ड किती रक्कम मिळते? जाणून घ्या.

Ankush Dhavre

IPL Players Actual Earning After Auction:

आयपीएलला जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असं म्हटंल जातं. प्रत्येक क्रिकेटपटूला या स्पर्धेत खेळावसं वाटतं. मात्र लाखो क्रिकेटपटूंमधून काही मोजक्याच क्रिकेटपटूंना या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते. (IPL Players Earning)

नुकताच दुबईत आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी लिलाव पार पडला. या लिलावात काही युवा खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावण्यात आली. तर मिचेल स्टार्कवर २४.७५ कोटी आणि पॅट कमिन्सवर २०.५० कोटींची बोली लावण्यात आली.

हे दोघेही स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. मात्र तुम्हालाही असा प्रश्न पडलाच असेल, की खरंच कमिन्स आणि स्टार्कला इतकी मोठी रक्कम मिळणार का? लिलावात लागलेल्या खेळाडूंना इनहॅन्ड किती मिळतात? जाणून घ्या.

भारतीय खेळाडूंना किती मिळतात?

भारतातील युवा खेळाडू समीर रिजवीला चेन्नईने ८.४० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं. तर कुमार कुशाराला दिल्लीने ७.२० कोटी आणि शाहरुख खानवर ७.४० कोटींची बोली लागली. (How Much Players Earns In IPL)

खरंच या खेळाडूंना इतकी रक्कम मिळणार का? तर याचं उत्तर आहे, नाही. कारण या लिलावात भारतीय खेळाडूंना जितकी रक्कम मिळते, त्या रक्कमेतून १० टक्के टीडीएसची कपात केली जाते. हे झाल्यानंतर खेळाडूंना आयटीआर दाखल करावा लागतो. यामध्ये खेळाडूंच्या खर्चाचा आणि इतर उत्पन्नाचा हिशोब असतो. त्यामुळे खेळाडूंना उत्पन्नाच्या आधारावर टॅक्स द्यावा लागतो. टीडीएस किती कापला जाणार, हे लिलावात किती बोली लागली आहे यावर अवलंबून असते. (Latest sports updates)

परदेशी खेळाडूंना किती मिळतात?

भारतीय खेळाडूंच्या बोली लागलेल्या रकमेतून १० टक्के तर परदेशी खेळाडूंच्या रकमेतून २० टक्के टीडीएस कपात केली जाते. मात्र परदेशी खेळाडूंना भारतीय खेळाडूंप्रमाणे टीडीएस व्यतिरिक्त कुठलाही टॅक्स द्यावा लागत नाही. या खेळाडूंना आयटीआर दाखल करण्याची गरज पडत नाही.

जर एखाद्या खेळाडूचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला गेला नसेल, तर त्याला वेगळे मानधन दिले जाते. टॅक्स आणि टीडीएस कापल्यानंतर खेळाडूंना किती रक्कम मिळते याचा अंदाज लावणं जरा कठीण आहे. कारण काही खेळाडूंचे कंपनीसोबत करार असतात. या करारातूनही त्यांना पैसे मिळत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खारमध्ये मोटारसायकल चोरी प्रकरण उघडकीस

IND vs AUS Hobart T20: भारतासमोर इतक्या धावांचे लक्ष्य , डेव्हिड स्टोइनिसच धमाकेदार अर्धशतक

Crime News : मालेगावमध्ये राडा! लहान मुलांचा किरकोळ वाद; दोन गटाचा एकमेकांवर गोळीबार

Mumbai : मुंबईत पुन्हा आढळला मतदारयादीत घोळ; एकाच व्यक्तीचे तीन EPIC नंबर, मनसेने पुरावाच दिला

धक्कादायक! साप घेऊन दुचाकीवरून प्रवास, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT