आयपीएल २०२५ मध्ये आज ११वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये होणार आहे. ही लढत गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.राजस्थानचा संघ विजयाच्या शोधात असणार आहे. राजस्थान रॉयल्सने आपले सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. तर चेन्नईने पहिला सामना जिंकलाय पण दुसऱ्या सामन्यात सीएसकेला पराभवाची चव चाखावी लागली होती. सीएसकेने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला आरसीबीने हरवलं होतं.
आयपीएलमधील दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर चेन्नईचं वर्चस्व दिसतंय.दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २९ सामने झालेत. यात राजस्थानने १३ सामने जिंकलेत तर सीएसकेने १६ सामन्यात विजय मिळवलाय. २००८ मध्ये आरआरने सीएसकेला अंतिम फेरीत हरवून पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले होते.
मात्र एकूण रेकॉर्डमध्ये चेन्नई सुपर किंग्स आरआरपेक्षा अधिक बलवान दिसत आहे. गेल्या पाच सामन्यांचा आपण आढावा घेतला तर त्यात राजस्थानचा संघ वरचढ दिसत आहे. गेल्या ५ सामन्यांमध्ये चेन्नईने केवळ एकच सामना जिंकला आहे तर राजस्थानने चार वेळा विजय मिळवलाय.
चेन्नई सुपर किंग्ज ५ विकेट्सने विजयी
राजस्थान रॉयल्सने ३२ धावांनी विजय मिळवला
राजस्थान रॉयल्स ३ धावांनी विजयी
राजस्थान रॉयल्सने ५ विकेट्सने विजय मिळवला
राजस्थान रॉयल्सने ७ विकेट्स राखून विजय मिळवला.
संजू सॅमसन (कर्णधा), यशस्वी जयसवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिम्रोन हेटमायर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, वनिन्दु हसरंगा, महेश थीक्षाना, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय सिंह, नितीश राणा, तुषार देशपांडे, शुभम दुबे, युद्धवीर चरक, फजल फारूकी, वैभव सूर्यवंशी, क्वेना मफाका, कुणाल राठौड़, अशोक शर्मा.
ऋतुराज गायकवाड, मथीशा पथिराना, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, डेवोन कॉन्वे, राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, आर. अश्विन, खलील अहमद, नूर अहमद, विजय शंकर, सॅम करन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुरजनपनीत सिंह, नाथन एलिस, जेमी ओवरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्दार्थ.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.