IPL 2025 च्या एलिमिनेट सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर २० धावांनी मात केली. रोहित शर्माने ५० चेंडूत ८१ धावा केल्या होत्या. या सामन्याचा रोहित शर्मा मॅन ऑफ द मॅच होता. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स हा क्वालिफायर २ सामना रंगणार आहे. या सामन्यातही रोहित शर्माकडून चांगल्या खेळीची अपेक्षा केली जात आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्याच्या दरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हिटमॅन रोहित काही लहान मुलांसह गप्पा मारत असल्याचे दिसते. छोट्या चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तरे रोहित देतो. तेव्हा एक फॅन रोहितला 'सर तुम्हाला आउट कसं करायचं?' असा प्रश्न विचारतो. त्यावर रोहित गंमतीत नाही, असं होऊ शकत नाही असे म्हणतो. रोहितच्या उत्तराने सर्व मुलं हसू लागतात.
आयपीएल २०२५ मध्ये रोहित शर्माने बऱ्यापैकी चांगली कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सकडून सलामीसाठी उतरताना रोहितने चार वेळा अर्धशतकीय खेळी केली आहे. क्वालिफायर २ मध्ये रोहितने ८१ धावा केल्या. जेव्हा गरज होती, तेव्हा-तेव्हा रोहितने परफॉर्म करुन संघाला मदत केली आहे. काही सामन्यात त्याने खराब कामगिरी देखील केली आहे. सुरुवातीचे काही सामने तो आउट ऑफ फॉर्म होता, पण नंतर त्याचा फॉर्म परतला.
गुजरात टायटन्सला एलिमिनेटर सामन्यात पराभूत करुन मुंबई इंडियन्सने क्वालिफायर २ मध्ये एन्ट्री मारली. आज मुंबई पॉईंट्स टेबलवर टॉपवर असणाऱ्या पंजाब किंग्सच्या संघाशी भिडणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल, तो फायनलमध्ये जाईल, तर ज्या संघाता पराभव होईल, त्या संघाचे आयपीएल २०२५ मधील आव्हान संपुष्टात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.