ipl rcb 2025 x
Sports

IPL 2025 पुन्हा सुरु होण्याआधीच RCB ला मोठा धक्का, 'ई साला कप नामदे'चं स्वप्न भंगणार? कारण...

IPL 2025 Updates : भारत पाकिस्तान तणावामुळे एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित करण्यात आले होते. येत्या काही दिवसात आयपीएल २०२५ ला पुन्हा सुरुवात होणार आहे. बीसीसीआयकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.

Yash Shirke

भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याने पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना रद्द करण्यात आला. सामन्यादरम्यान पाकिस्तानने भारताच्या सीमेलगतच्या भागांवर हल्ले केले होते. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. १६ किंवा १७ मे च्या दरम्यान आयपीएल पुन्हा सुरु होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लवकरच बीसीसीआय तारखांसंबंधित घोषणा करेल अशी चाहत्यांना आशा आहे.

आयपीएलचे उर्वरित १६ सामने १६ मे पासून सुरु होतील, तर अंतिम सामना ३० मे रोजी खेळवला जाईल अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. आयपीएलबद्दल चर्चा सुरु असताना एक रिपोर्ट समोर आल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची आणि त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. आरसीबीचा स्टार गोलंदाज जोश हेजलवूड आयपीएलमधील पुनरागमनावर शंका व्यक्त केली जात आहे.

क्रिकइन्फोच्या एका रिपोर्टनुसार, जोश हेजलवूड IPL 2025 खेळण्यासाठी परतेल का याची खात्री नसल्याचे म्हटले जात आहे. हेजलवूडच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे आरसीबीच्या मागील सामन्यांमध्ये सहभागी झाला नव्हता. आता आयपीएल २०२५ पूर्णपणे स्थगित झाले नसले, तरीही हेजलवूड उर्वरित सामने गमावले अशी शक्यता वर्तवली जात आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी जॉश हेजलवूड खास ठरला होता. तो पर्पल कॅपच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. १० सामन्यांमध्ये हेजलवूडने तब्बल १८ विकेट्स घेतल्या आहेत. ३ सामन्यांमध्ये त्याने तीन किंवा तीनपेक्षा जास्त विकेटस् घेतल्या. आरसीबीची गोलंदाजी विभागाची बाजू हेजलवूडमुळे भक्कम झाली होती, पण तो सामना खेळत नसल्याचा परिणाम बंगळुरुच्या खेळावर नक्की होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT