Royal Challengers Bengaluru Virat Kolhi IPL 2025 Twitter (X)
Sports

RCB साठी वाईट बातमी; माजी क्रिकेटपटूच्या भयंकर भविष्यवाणीनं धडधड वाढली

IPL 2025 : आरसीबी विरुद्ध केकेआर हा आयपीएल २०२५ मधील पहिला सामना ईडन गार्डन्स येथे खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी एका माजी क्रिकेटपटूने केलेल्या एका वक्तव्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.

Yash Shirke

Royal Challengers Bengaluru : आयपीएलच्या नव्या सीझनला आज सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. मागील अठरा वर्षांपासून चांगली कामगिरी करुनही बंगळुरूच्या संघाला ट्रॉफी जिंकणे शक्य झाले नाही. यावरुन संघाला अनेकदा ट्रोल देखील केले जाते. दरम्यान बंगळुरूचा संघ पॉईंट टेबलवर शेवटच्या स्थानी करण्याबाबत अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांनी भविष्यवाणी केली.

क्लब प्रेयरी फायर पॉडकास्टमध्ये गिलख्रिस्टने हजेरी लावली. 'आरसीबी पॉईंट टेबलवर शेवटच्या स्थानी राहील असे मला वाटते. त्यांच्या संघात बरेचसे इंग्लिश खेळाडू (इंग्लंडचे खेळाडू) आहेत या फॅक्टच्या आधारे मी हे बोलू शकतो', असे वक्तव्य अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांनी केले. माजी इंग्लिश क्रिकेटपटू मायकल वॉन यांच्यासह गिलख्रिस्ट क्लब प्रेरी फायर पॉडकास्ट होस्ट करतात.

'मी विराट कोहलीच्या विरोधात किंवा त्याच्या चाहत्यांच्या विरोधात काही बोलत नाही. उलट मी चाहत्यांची माफी देखील मागतो, पण तुम्हाला तुमच्या रिक्रूटिंग एजंटशी बोलावे लागेल' असे अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांनी म्हटले. मायकल वॉन यांची मस्करी करण्यासाठी गिलख्रिस्टने हे विधान थट्टेने केल्याचे म्हटले जात आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आयपीएल फायनलमध्ये पराभव करणारे अ‍ॅडम गिलख्रिस्ट हे पहिले कर्णधार आहेत. २००९ मध्ये आरसीबीने पहिल्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये स्थान मिळवले होते. तेव्हा अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांच्या नेतृत्त्वात डेक्कन चार्जर्स संघाने बंगळुरूच्या संघावर विजय मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT