ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयपीएल २०२५ ची आजपासून सुरुवात होत आहे. पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स असा रंगणार आहे.
आयपीएलमध्ये फलंदाज पॉवरफुल शॉट्स मारतात. मैदानात चौकार, षटकारांचा पाऊस होतो. परंतु या खेळाची दुसरी बाजू म्हणजे डक.
डक म्हणजे क्रिकेटच्या भाषेत शून्य धावांवर बाद होणे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शून्यावर बाद होणारे खेळाडू माहीत आहे का?
आयपीएलमध्ये सर्वाधिक शून्यावर बाद होण्याच्या यादीत दिनेश कार्तिक पहिल्या क्रमांकावर आहे. तो २३४ डावांमध्ये १८ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
या यादीत ग्लेन मॅक्सवेल दुसऱ्या स्थानावर आहे. तो १२९ डावांमध्ये १८ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा २५२ डावांमध्ये १७ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
आयपीएलच्या इतिहासात पियुष चावला ९२ डावांमध्ये १६ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
कोलकाता संघाकडून खेळणारा सुनील नारायण १०९ डावांमध्ये १६ वेळा शून्यावर बाद झाला आहे.