ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
विराट कोहली सलग १७ वर्षांपासून आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे.
२००८ पासून एकाच फ्रेंचायझीकडून आयपीएल खेळणारा विराट एकमेव खेळाडू आहे.
आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नावावर अनेक जबरदस्त रेकॉर्ड्स आहेत. पण कोहलीच्या नावावर असेही काही लाजिरवाणे रोकॉर्डस आहेत. जे त्याच्या चाहत्यांना माहीत नसेल.
आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध कोहलीने ६७ चेंडूत शतक झळकावले, जे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात संथ खेळी आहे.
सर्वाधिक आयपीएल सामने हारणाऱ्या कर्णधारांच्या यादीत महेंद्रसिंग धोनीनंतर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कोहलीने आरसीबीसाठी २०१३ ते २०२१ पर्यंत एकूण १४३ सामन्यात आरसीबीचे नेतृत्व केले. यापौकी ६६ सामने जिंकले आणि ७० सामने हारले.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक डॉट बॉल खेळण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने आतापर्यंत २५२ सामन्यांमध्ये २०३१ डॉट बॉल खेळले आहेत.