ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, सायट्रिक अॅसिड, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
लिंबू पाणी पोषक तत्वांनी समृद्ध असते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ते प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिड असते, जे पोटातील पाचक एंजाइम सक्रिय करते आणि अन्न लवकर पचण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
लिंबू पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. ज्यामुळे शरीर डिटॉक्स होते.
लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी असते. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. यामुळे सर्दी, खोकला सारख्या आजारांपासून रक्षण होते.
लिंबू पाणी पचनाची गति वाढवते. यामुळे फॅट लवकर बर्न होण्यास मदत होते. आणि वजन कमी होते.
लिंबूमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. रिकाम्या पोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्याने त्वचेतील डेड सेल्स कमी होऊन त्ववचा चमकदार होते.