ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मोहरी, कढीपत्ता, हिंग, टोमॅटो, रसम पावडर, लाल तिखट, हळद, चिंचेचा कोळ, मीठ आणि तेल
सर्वप्रथम, एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा आणि त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिंग घाला.
टोमॅटो बारीक चिरून घ्या आणि पॅनमध्ये घाला आणि शिजू द्या.
यानंतर चिंचेचा कोळ, हळद, लाल तिखट, मीठ आणि पाणी घालून उकळी येऊ द्या.
आता यामध्ये रस्सम पावडर घाला आणि चांगले ढवळून घ्या आणि उकळी आल्यानंतर मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजवा.
रस्सम शिजल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
चटपटीत साऊथ स्टाइल रस्सम तयार आहे. गरमागरम भातासोबत याचा आस्वाद घ्या.