Vaibhav Suryavanshi Shubman Gill X
Sports

वैभव सूर्यवंशीच्या शतकावर शुबमन गिलने केली कमेंट; जडेजाला आला राग, म्हणाला, '१४ वर्षांच्या मुलाने...'

Vaibhav Suryavanshi : राजस्थान विरुद्ध गुजरात या सामन्यात वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूत १०० धावा केल्या. या खेळीवर शुबमन गिलने कमेंट केली. गिलने केलेल्या विधानावर जडेजाने संताप व्यक्त केला आहे.

Yash Shirke

वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना ३५ चेंडूंमध्ये १०० धावा करत इतिहास रचला. ही ऐतिहासिक कामगिरी करताना वैभवने अनेक विक्रम मोडले, बरेचसे नवे विक्रम रचले. वैभवच्या वादळी शतकामुळे राजस्थानला २१० धावांचे लक्ष्य सहज पार करता आले. हा सामना संपल्यावर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने 'आज वैभवचा दिवस होता' असे वक्तव्य केले. त्याच्या विधानावरुन अजय जडेजा यांनी गिलवर टीका केली आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना संपल्यानंतर शुबमन गिलने वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले. तो म्हणाला, 'आज वैभवचा दिवस होता. नशीब त्याच्या बाजूने होते. त्याची फटकेबाजी उत्कृष्ट दर्जाची होती आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला.' गिलच्या या वक्तव्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा भडकला.

'१४ वर्षांच्या मुलाने स्वतःवर प्रबळ विश्वास ठेवला आणि तो आत्मविश्वास त्याने आपल्या खेळातून सिद्ध केला. त्यामुळे जर कोणी टीव्हीवर म्हणत असेल की, हा फक्त त्याचं नशीबाचा भाग आहे, तर ते चुकीचे आहे. त्याचे वय आणि त्याच्यावर असलेल्या दबावाचा विचार करता वैभवच्या प्रतिभेला अधिक दाद मिळाली पाहिजे' असे वक्तव्य अजय जडेजा यांनी जिओहॉटस्टारशी बोलताना केली.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीने ऐतिहासिक खेळी केली. त्याने २६५.७९ च्या स्ट्राईक रेटने ३८ चेंडूंमध्ये १०१ धावा केल्या. ही खेळी करताना वैभवने ७ चौकार आणि ११ षटकार मारले. थोडक्यात वैभवने १०१ पैकी ९४ धावा फक्त चौकार-षटकार यांच्या माध्यमातून काढल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसाठी सोप्या गोष्टी अवघड होऊ शकतात, पाहा राशीभविष्य

Mumbai Local Train: मुंबई लोकलचा ४ दिवस रेल्वे ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

Ganeshotsav: पुण्यात आता ‘नो लिमिट’, विसर्जन मिरवणुकीत होणार ढोल-ताशांचा जल्लोष, पथकांवरची सक्ती हटली

Friday Horoscope : कामाच्या ठिकाणी धावपळ होणार; 3 राशींच्या लोकांना आव्हाने पेलावे लागणार

Panvel Crime News: मुलीच्या गळ्यावर कोयता, पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला; जामीनावरील आरोपीचा पनवेलमध्ये धुडगूस

SCROLL FOR NEXT