CSK Playoff Scenario : थालाच्या सीएसकेचे ७ पराभव, तरीही चेन्नईला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी; कसं आहे समीकरण? वाचा

Chennai Super Kings IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्स सध्या आयपीएल पॉईंट्स टेबलच्या शेवटच्या स्थानी आहे. चेन्नईकडे फक्त ४ गुण आहेत. चेन्नई प्लेऑफमध्ये कशी जाऊ शकते? जाणून घ्या समीकरण...
CSK Playoff Scenario
CSK Playoff Scenario X
Published On

IPL 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने सर्वात खराब कामगिरी केली आहे. सुरुवातीला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात चेन्नईचा विजय झाला. पण त्यानंतर त्यांच्या पराभवाची मालिका सुरु झाली. ऋतुराज गायकवाड दुखापतीने आयपीएल बाहेर पडला. त्यानंतर एमएस धोनीकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. धोनीच्या नेतृत्त्वातही चेन्नईने खराब खेळ केला.

चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएलच्या पॉईंट्स टेबलवर दहाव्या स्थानावर आहे. त्यांनी एकूण ९ सामने खेळले आहेत. ९ पैकी ७ सामने चेन्नईने गमावले आहेत. तर २ सामन्यात सीएसकेचा विजय झाला. या दोन विजयी सामन्यांमुळे चेन्नईकडे ४ गुण आहेत. आता सीएसकेचा संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून जवळ-जवळ बाहेर पडला आहे. तरीही त्यांच्या चाहत्यांना चेन्नई प्लेऑफमध्ये जाईल अशी आशा आहे.

CSK Playoff Scenario
वैभव सूर्यवंशी खरंच १४ वर्षांचा आहे का? जुन्या मुलाखतीमुळे शतकवीरावर होतायेत फसवणूकीचे आरोप; काय आहे सत्य?

चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये प्रवेश कसा करु शकते?

१, आज (३० एप्रिल) चेन्नई सुपर किंग्सचा इन-फॉर्म पंजाब किंग्ससोबत सामना आहे. या सामन्यासह चेन्नईला पुढील पाचही सर्व सामने जिंकावे लागतील. तेव्हा त्यांनी १० गुण मिळतील आणि १४ गुणांसह प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पात्र होतील.

२. जर चेन्नईने सलग ५ सामने जिंकले तरीही त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेशासाठी त्यांचा नेट रन रेट सुधारावा लागेल. चेन्नईचा नेट रन रेट आता -१.३९२ इतका आहे. जरी गुणांची बरोबरी झाली तरी नेट रन रेटमुळे चेन्नई प्लऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडू शकते.

३. चेन्नईने १४ गुण मिळवून नेट रन रेट जरी सुधारला तरी त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची संधी इतर संघांच्या कामगिरीवर अवंलबून राहील. मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या सारख्या संघांनी जर अनेक सामने गमावले आणि त्यांना १४ गुणांचा टप्पा ओलांडता आला नाही, तर चेन्नईला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळेल.

CSK Playoff Scenario
Rohit Sharma : गरीबीमुळे काकांकडे राहायचा, ऑफ-स्पिनर ते विस्फोटक फलंदाज; वाचा रोहित शर्माचा संघर्ष

सध्या चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता ०.०४ टक्के इतकी आहे. चेन्नई प्लेऑफमध्ये जाणार नाही असे सर्वजण म्हणत आहेत. पण तरीही काही चाहत्यांना चेन्नई प्लेऑफमध्ये जाऊ शकते अशी आशा आहे.

CSK Playoff Scenario
कुलदीप यादवनं रिंकू सिंहला दोनदा कानफटवलं; KKR नं शेअर केला दोघांचा नवा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com