Rajasthan Royals Fans Fighting Viral Video x
Sports

IPL 2025 च्या सामन्यात दोन गटात तुफान हाणामारी, स्टेडियमवर गोंधळ; Video व्हायरल

IPL 2025 Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये क्रिकेट स्टेडियममध्ये दोन गटात हाणामारी सुरु असल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडीओ गुवाहाटीमधला असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

Viral Video : आयपीएल २०२५ ची धामधुम पाहायला मिळत आहे. दररोज दोन वेगवेगळे संघ एकमेकांसमोर येत आहेत. प्रत्येक क्रिकेटप्रेमी दरवर्षी आयपीएल येण्याची वाट पाहत असतो. इंडियन प्रीमियर लीग हा क्रिकेट प्रेमींसाठी सुगीचा हंगाम असल्याचे म्हटले जात आहे. आयपीएल सुरु असताना सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडीओची चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये सामना पाहण्यासाठी स्टेडियमला आलेले चाहते मारामारी करत असल्याचे पाहायला मिळते.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत स्टेडियमच्या स्टँडमध्ये चाहते हाणामारी करताना दिसत आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा राडा झाल्याचे म्हटले जात आहे. मारामाराचे कारण स्पष्ट झाले नसले तरी राजस्थान रॉयल्सच्या समर्थकांमध्ये अंतर्गत वादातून हा राडा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ज्यावेळेस ही मारामारीची घटना घडली तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या लागोपाठ विकेट्स पडल्या होत्या. ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर मैदानात फलंदाजी करत होते. त्यावेळेस सामना पाहण्यासाठी आलेल्या राजस्थानच्या चाहत्यांच्या गटामध्ये वाद सुरु झाला. वादाचे, भांडणाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाल्याचे म्हटले जात आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यामध्ये कोलकाता संघाचा विजय झाला होता. केकेआरने तब्बल ८ विकेट्सने राजस्थानला हरवले होते. या सामन्यानंतर राजस्थानच्या संघाने कमबॅक केले. त्यानंतर राजस्थानने बलाढ्य अशा चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांचा पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-UK Trade Deal: भारत-ब्रिटन मुक्त व्यापाराचा फायदा नेमका कुणाला?; काय स्वस्त- काय महाग होणार?

Maharashtra Politics: राज्यात 100 कोटींचा घोटाळा? हेल्थ एटीएमची विनाटेंडर खरेदी?

Vijay Ghadge Health : मोठी बातमी! अजित पवारांची पुण्यात भेट, लातूरला परतताना अचानक विजय घाडगे यांची प्रकृती खालावली

Cricket Retirement : टीम इंडियाला मोठा झटका; IND VS ENG मालिकेदरम्यान स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

Migraine: प्रवास करताना मायग्रेनचा त्रास होतोय? तर करा 'हे' प्रभावी उपाय

SCROLL FOR NEXT