Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

jaisalmer bus fire : जैसलरमध्ये प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झालाय.
jaisalmer bus fire update
jaisalmer bus fire :Saam tv
Published On
Summary

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एसी बसला लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू

प्रवासादरम्यान बसमध्ये अचानक धूर येऊ लागल्याचं समोर आलं

प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खिडक्या आणि दरवाजांतून उड्या मारल्या

घटनेत १७ प्रवासी गंभीर जखमी

राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात मंगळवारी नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती झाली. जैसलमेरहून जोधपूरला जाणाऱ्या एका खासगी बसला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर रस्त्यावर मोठा धूर झाला. त्यानंतर बसला भीषण आग लागली. बसला आग लागल्यानंतर प्रवाशांची एकच आरडाओरड झाली. ५७ प्रवासी असलेल्या बसमधील १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शोक व्यक्त केला.

jaisalmer bus fire update
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात उलथापालथ होणार? आठवलेंच्या ऑफरनंतर प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'ने ठेवली एक अट

मिळालेल्या माहितीनुसार, एसी बस जैसलमेरहून जोधरपूरला निघाली होती. मात्र, रस्त्यात अचानक बसमधून धूर निघू लागला. त्यानंतर बसला आग लागली. दुर्घटनेवेळी बसमध्ये ५७ प्रवासी होते. तर आग लागल्यानंतर काही प्रवाशांनी खिडकी-दरवाज्यातून उड्या मारल्या. मात्र, काही जण बसमध्येच अडकले. त्यामुळे बसच्या आगीत होरपळून १२ जणांचा मृत्यू झाला. रस्त्यावर उपस्थितांनी तातडीने घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.

jaisalmer bus fire update
BMC Election : मोठी बातमी! राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका कधी होणार? महत्वाची माहिती समोर

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रथम बसला लागलेली आग विझविली. त्यानंतर आगीत होरपळलेल्या जखमी प्रवाशांना तीन रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केलं. दुर्घटनेतील जखमी १७ प्रवाशांना दाखल केलं. त्यातील १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

अग्निशमन दलाचे अधिकारी कृष्णपाल सिंह राठोड यांनी सांगितलं की, १०-१२ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेची गांभीर्य लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने एक कंट्रोल रुम बनवला आहे. त्यात प्रवाशांच्या नातेवाईकांना माहिती मिळेल. रुग्णालयात एकूण १७ प्रवाशांना दाखल करण्यात आलं होतं. त्यातील काही लोकांवर प्राथमिक उपचार करून जोधपूरला पाठवण्यात आलं आहे. तर जोधपूरला घेऊन जाताना रस्त्यात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com