BMC Election : मोठी बातमी! राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका कधी होणार? महत्वाची माहिती समोर

BMC Election update : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका या डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीपर्यंत निवडणुका जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
BMC Election
Election 2025Saam Tv
Published On
Summary

मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता

डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी 2025 मध्ये या निवडणुका होण्याची शक्यता

राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारयादी सुधारणा कार्यक्रमाची घोषणा

सर्व राजकीय पक्षांनकडून आयोगाकडे तक्रारीही दाखल केल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकासाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर मतदारयादीतील त्रुटी आणि इतर आक्षेपासह आज सर्व पक्षीय नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्य निवडणूक आयोगाकडून पालिका निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. त्यानंतर आता राज्यातील २९ महानगरपलिकांच्या निवडणुका डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीपर्यंत निवडणुका लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

BMC Election
SSC-HSC exam 2026 Schedule : दहावी आणि बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधीपासून सुरू होणार पेपर?

निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडत जाहीर केली. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. दुसरीकडे या राजकीय नेत्यांच्या निवडणूक आयोगाच्या २९ महापालिकांच्या निवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर करण्याच्या घोषणेकडे लक्ष लागलं आहे.

आता याच महापालिकांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. एकीकडे राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे लवकरच २९ महानगरपालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीपर्यंत लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

BMC Election
Pune : नाशिकनंतर पुण्यात पोलिसांकडून कारवाईचा धडाका; १८ सराईत गुन्हेगार तडीपार, नावे आली समोर

यादीत नावे जोडणे, वगळणे हे काम राज्य निवडणूक आयोगाचे नाही - निवडणूक आयोग

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा नावे वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याविषयी माहिती दिली.

राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आयोगाच्या कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी आयुक्त वाघमारे बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com