SSC-HSC exam 2026 Schedule : दहावी आणि बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधीपासून सुरू होणार पेपर?

Maharashtra board exam 2026 update: १० वी १२ वी परीक्षेचं वेळापत्रक समोर आलं आहे. दहावी आणि बारावीचा पहिला पेपर कधी आहे, जाणून घ्या.
STUDETNS
HSC Exam saam tv
Published On
Summary

महाराष्ट्र राज्य मंडळाने दहावी व बारावी २०२६ लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर

बारावी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान होणार

दहावी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान घेतली जाणार

सचिन जाधव, साम टीव्ही

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर केली आहे. शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षांची तारीख जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयारी सुरु करावी लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या तारखेनुसार बारावीची परीक्षा ही 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा ही 20 फेब्रुवारी ते 18 मार्च रोजी होणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या तयारीला सुरुवात करावी लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

परीक्षा कधी?

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ पर्यंत होईल. ही परीक्षा माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षेसह होणार आहे. तर दहावीची परीक्षा ही २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ पर्यंत पार पडली जाईल.

STUDETNS
Bihar Election : NDA चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजप-जेडीयू किती जागांवर निवडणूक लढणार? जाणून घ्या

प्रात्याश्रिक, तोंडी परीक्षा कधी?

बारावीची प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापान तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा ही २३ जानेवारी २०२६ ते ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होईल. तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह होईल. दहावीची प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा ही २ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण होईल. यावेळी शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा होईल.

STUDETNS
Pakistan Protest : नेपाळनंतर पाकिस्तान पेटलं! सुरक्षादलाच्या जवानांचा TLP कार्यकर्त्यांवर गोळीबार; 280 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा

मंडळाने शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com