Pakistan Protest : नेपाळनंतर पाकिस्तान पेटलं! सुरक्षादलाच्या जवानांचा TLP कार्यकर्त्यांवर गोळीबार; 280 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा

Pakistan Protest News : नेपाळनंतर पाकिस्तान पेटल्याचं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानी सुरक्षादलाच्या जवानांकडून TLP कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्यात आला.
Pakistan Protest News
Pakistan Protest Saam tv
Published On
Summary

पाकिस्तानात गाझा समर्थनार्थ काढण्यात आलेल्या टीएलपी मोर्चावर सुरक्षा दलांनी गोळीबार

टीएलपीचा दावा आहे की अवघ्या ३ तासांत २८० जणांचा मृत्यू झाला

मोर्चादरम्यान साद रिजवीच्या मृत्यूची अफवा पसरली

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर संघर्ष उफाळून आला आहे. यामुळे पाकिस्तानात वातावरण तापलं आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रविवारी परिस्थिती हाताबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. लाहौर ते इस्लामाबाद येथील मोर्चा रोखण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी लाठीचार्ज आणि अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तर टीएलपी प्रमुख साद रिजवीची देखील गोळ्या झाडून संपवल्याची अफवा पसरली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांसोबत रेंजर्सनेही मोर्चा रोखण्यासाठी मैदानात उतरले. आंदोलकर्त्यांचा आरोप आहे की, रेंजर्सने आधुनिक शस्त्राचा वापर केला. तसेच त्यांनी अनेक ठिकाणी गोळीबार केल्याचाही आरोप केला आहे. टीएलपी प्रमुख साद हुसैन रिजवी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चाचा उद्देश हा 'गाजा' या देशाच्या समर्थनार्थ आणि इस्त्रायलच्या विरोधात काढला होता. परंतु पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली.

साद रिजवीने शुक्रवारी नमाजादरम्यान समर्थकांना म्हटलं की, 'अटकेची भीती नाही. गोळीबारावरही आक्षेप नाही. शहीद होणे आमच्या नशिबात आहे'. मागील आठवड्यात पोलिसांच्या कारवाईत ११ टीएलपी कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तर ५० हून अधिक गंभीर जखमी झाल्याचा दावा केला जात आहे.

Pakistan Protest News
Maharashtra Politics : राज आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट, युती होणार का? बाळा नांदगावकरांनी मोजक्या शब्दात सांगितलं

पाकिस्तानी मंत्री तलाल चौधरी यांनी टीएलपीवर टीका करताना म्हटलं की, टीएलपी संघटना गाजावरील संकटाचा बहाणा करत राजकीय फायदा करून घेत आहे. पाकिस्तानी सरकार कोणत्याही संघटनेला हिंसा करण्याची परवानगी देणार नाही.

टीएलपी संघटनेच्या दाव्यानुसार, पाकिस्तानच्या मरीदके शहरात पाकिस्तानी रेंजर्स आणि पोलिसांनी गोळीबार केला. त्यांनी अवघ्या तीन तासांत २८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९०० हून अधिक लोक गोळीबारात जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. नेपाळनंतर पाकिस्तानीतील हिंसाचाराची जगभर चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com