Maharashtra Politics : राज आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट, युती होणार का? बाळा नांदगावकरांनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Political News : राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीविषयी बाळा नांदगावकरांनी मोजक्या शब्दात सांगितलं.
Raj and uddhav thackeray
Maharashtra Politics Saam tv
Published On
Summary

राज आणि उद्धव ठाकरे यांची गेल्या तीन महिन्यांतील सहावी भेट

दोघांच्या भेटीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया

राजकारणाच्या पलीकडे जाऊन कुटुंबात संवाद होतोय, हे महत्त्वाचे आहे, असे नांदगावकर म्हणाले

शिवसेना-मनसे युती होणार का, यावर त्यांनी बोलणं टाळलं

मयूर राणे, साम टीव्ही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीपुन्हा एकदा भेट झाली. राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पोहोचले. गेल्या तीन महिन्यात ठाकरे बंधूंची सहाव्यांदा भेट झाली. दोन्ही कुटुंबाच्या भेटीवर मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकरांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

बाळा नांदगावकर यांनी ठाकरे बंधूंच्या भेटीविषयी भाष्य केलं. बाळा नांदगावकर म्हणाले, 'मला मनापासून आनंद झाला आहे. ठाकरे कुटुंबातील दोन बंधू एकमेकांना भेटले. गेल्या दोन-तीन महिन्यात ते सतत भेटत आहेत. प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे कुटुंबातील दोन ठाकरे बंधू यांची आज भेट झाली. काही लोक ठाकरे परिवारावर प्रेम करत नसले, जे इतर भाष्य करतील. जे बाळासाहेबांनी त्यांच्या कुटुंबावर प्रेम करतात अशा सर्वांना आनंद झाला आहे'.

Raj and uddhav thackeray
Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

'गेल्या 19-20 वर्षे दोन भावंडात संवाद नव्हता. आता जो संवाद होत आहे. एकमेकांत विश्वास होणे निर्माण होणे गरजेचे आहे. एकमेकांची मन जुळली तर पुढे चांगलं होते. उद्धव ठाकरे जेवायला जातात, राज ठाकरे त्यांच्या घरी जेवायला जातात. आम्हाला याचा निश्चित आनंद आहे. सगळ्या गोष्टीला राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहणार का? असा सवार नांदगावकरांनी केलं.

Raj and uddhav thackeray
Dipika padukone : दीपिका पदुकोण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; हिजाब घातल्याने ट्रोल, VIDEO

'राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात पाहतो की, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण नातीगोती पाहत असतो. राजकारणाचा मी एकमेकांवर टीकाटीप्पणी करतो सभागृहात आभाळ करतो. रस्त्यावर लढाई लढतो. आम्ही आमचा सुसंवाद सोडलेला नाही. आज दोघे भाऊ भेटले म्हणजे दोन पक्षाचे नेते भेटले म्हणजे चर्चा तर होणारच राजकारणावर ही चर्चा झाली असेल. मी आज खूप आनंदी आहे. युती होणार का, याचा काही अर्थ नसतो. जोपर्यंत त्या दोन भावांचं अधिकृत होत नाही. तोवर भाष्य करणे योग्य नाही, पण असं दिसते आहे त्या दिशेने वाटचाल सुरू झालेली असावी, असं मला दिसते मन जोडलेली असावी, असे ते म्हणाले.

Raj and uddhav thackeray
Panvel : पनवेल महानगरपालिकेचा कारभार पुन्हा चर्चेत; 8 कर्मचाऱ्यांची अचानक पदावनती, पालिकेत नेमकं काय घडलं?

'कोणी कोणावर टीका करायची त्यांनी करावी. ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्र प्रेम करतो. लोकांचे प्रेम आहे. इतर भाषिकांचे सुद्धा प्रेम आहे. ठाकरे कुटुंबात सुद्धा लोकांवर प्रेम आहे. आपण राजकीय पक्ष जे निर्माण केले आहे. ते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उद्या ठाण्यात मोर्चा निघणार आहे. तिकडे कार्यकर्ते असतील, ठाण्याच्या मोर्चात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सामील होऊ शकतो. मनसेच्या वतीने दीपोत्सव होतो. या दृष्टीने कदाचित चर्चा झाली असेल पण मला माहिती नाही ते येणार की नाही, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com