Dipika padukone : दीपिका पदुकोण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; हिजाब घातल्याने ट्रोल, VIDEO

Dipika padukone News : अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलीय.. दिपीकाच्या एका व्हिडिओमुळे तिला ट्रोल करण्यात येतय...मात्र या व्हिडिओत नेमकं काय आहे? दिपीका वारंवार वादात का अडकतेय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Dipika padukone troll
Dipika padukone Saam tv
Published On

अबू धाबीच्या शेख जाय़द ग्रँड मशिदीत पर्यटनाच्या जाहिरातीसाठी अबाया परिधान केल्यानं दीपिका पादुकोण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलीय..रणवीर सिंगनं इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करून या व्हिडिओला मेरा सुकून असं कॅप्शन दिलं.. आणि त्यानंतर हिजाब घातला म्हणून दीपिकाला ट्रोलिंगला सामोर जावं लागलं....याआधी सुद्धा दीपिका पादुकोण वेगवेगळ्या कारणांनी ट्रोल झालीय..

Dipika padukone troll
Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

2015 साली 'माय बॉडी, माय चॉइस' अशा फेमिनिस्ट भूमिकेमुळे दीपिका ट्रोल झाली. त्यानंतर 2020 ला जेएनयूमधील आंदोलनात सहभागी झाल्यानं दीपिकाला अँटी नॅशनल म्हणत ट्रोलिंग.. 2023 मध्ये चित्रपटातील एका सीनमधील भगव्या रंगाच्या बिकनीमुळे हिंदू धर्माचा अपमान झाल्यामुळे ट्रोलिंग..

Dipika padukone troll
Mumbai one App : खूशखबर! मुंबईत आता एका तिकिटावर कुठेही फिरा, PM नरेंद्र मोदींकडून हटके अॅप लाँच

दीपिका पादुकोननं अद्याप ट्रोलिंगवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही...मात्र अबू धाबी टुरिझम बोर्डनं, "शेख जायद मशीदेत अबाया हा ड्रेस कोड आहे, यात प्रोमोशन नाही, आदर आहे, असं स्पष्टीकरण दिलयं...त्यामुळे धार्मिक संवेदनशीलता आणि ध्रुवीकरण यामुळे असे वाद चिघळत जातात...कलाकारांना धार्मिक मुद्द्यांवरून ट्रोल करण्याची गरजच काय? दीपिकाने मंदिरात दुपट्टा घेतला, मशिदीत अबाया परिधान केला. तर.यात चुकीचे काय? हे ज्याचं त्यानं ठरवावं....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com