Mumbai one App : खूशखबर! मुंबईत आता एका तिकिटावर कुठेही फिरा, PM नरेंद्र मोदींकडून हटके अॅप लाँच

Mumbai one App news : मुंबईत आता एका तिकिटावर कुठेही फिरता येणार आहे. PM नरेंद्र मोदींकडून हटके अॅप लाँच करण्यात आला आहे.
Mumbai one App
Mumbai one App news Saam tv
Published On
Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मुंबईवन' ॲपचे उद्घाटन

ॲपवर एकाच तिकीटावर विविध प्रवास सेवा वापरण्याची सुविधा

ॲपमध्ये मेट्रो, बस, लोकल, मोनोरेल, टॅक्सी आदी सेवा

ॲप QR आधारित असून प्रवाशांचा प्रवास होणार कॅशलेस आणि सोयीस्कर

संजय गडदे, साम टीव्ही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते "मुंबईवन" या अत्याधुनिक मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात आलं. हे ॲप आता सर्वसामान्य मुंबईकरांसाठी डाउनलोडसाठी उपलब्ध झालं आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) तर्फे विकसित करण्यात आलेले हे ॲप भारतातील पहिले कॉमन मोबिलिटी ॲप ठरले आहे. ज्यामध्ये मुंबई महानगर प्रदेशातील ११ सार्वजनिक वाहतूक संस्था — मेट्रो, मोनोरेल, उपनगरी रेल्वे, तसेच BEST, TMT, NMMT, MBMT, KDMT, MBMT, Mira-Bhayandar इत्यादींचा समावेश आहे.

"वन सिटी – वन कार्ड – वन ॲप" या संकल्पनेवर आधारित असलेले “मुंबईवन” ॲप नागरिकांना मेट्रो, बस, लोकल, टॅक्सी, ऑटो, मोनोरेल, पार्किंग आणि डिजिटल पेमेंट्ससारख्या सर्व प्रवास सेवांचा वापर एका क्लिकवर करण्याची सुविधा देते. हे ॲप QR आधारित डिजिटल तिकीट प्रणालीवर चालणारे आहे. त्यामुळे प्रवाशांना आता विविध प्रवास माध्यमांसाठी वेगवेगळे तिकीट घेण्याची गरज भासणार नाही.

Mumbai one App
Nashik : नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला! पोलिसांनी उतरवला केंद्रीय मंत्र्यांच्या निकटवर्तीयांचा माज, काय आहे प्रकरण?

महानगर आयुक्तांनी सांगितले की, 'मुंबईवन' ॲपमुळे मुंबईकरांना सुलभ, सुरक्षित आणि पूर्णपणे कॅशलेस प्रवासाचा नवा अनुभव मिळणार आहे. ॲपमध्ये ग्रीन मोबिलिटीचा विचार करण्यात आला असून, वापरकर्त्यांच्या सोयीसाठी हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये इंटरफेस उपलब्ध आहे.

Mumbai one App
PM Narendra Modi : मुंबईला मिळालं आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ; दि. बा. पाटील यांचं स्मरण करत PM मोदी काय म्हणाले? VIDEO

हे ॲप गुगल क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित असून, सरकारी सुरक्षा मानकांचे पालन करते. त्यामुळे डेटा सुरक्षेसह जलद व विश्वसनीय सेवा मिळणार आहे. सध्या या ॲपचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या ९ ते १५ लाखांच्या दरम्यान असून, लवकरच ती ५० लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. या उपक्रमामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीत क्रांतिकारी बदल घडून प्रवाशांना 'एक ॲप – अमर्याद प्रवास' या संकल्पनेचा खरा अर्थ अनुभवता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com