Nashik Crime
Nashik Crime Saam tv

Nashik : नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला! पोलिसांनी उतरवला केंद्रीय मंत्र्यांच्या निकटवर्तीयांचा माज, काय आहे प्रकरण?

Nashik Crime news : नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निकटवर्तीयांचा माज उतरवला आहे. पोलिसांनी कुख्यात गुंडाची धिंड काढली.
Published on
Summary

सातपूर गोळीबार प्रकरणात आरपीआयचे प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांना अटक

भूषण लोंढेने केला होता बारमध्ये गोळीबार

प्रकाश लोंढे आरपीआय आठवले गटाचे वरिष्ठ पदाधिकारी

मुख्य आरोपी भूषण लोंढे अद्याप फरार

नाशिकमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीने तोंड वर काढलं आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांचा उच्छाद सुरु आहे. नाशिक पोलिसांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपींचा माज उतरवला आहे. सातपूर गोळीबार प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी आरोपींना कोर्टात हजर केलं. त्यावेळी धक्कादायक बाब उघडकीस आली.

सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करत असताना आरोपींनी पोलिसांसमोर कबुली दिली. आरपीआय आठवले गटाचा नेता प्रकाश लोंढे आणि मुलगा दीपक लोंढेसह अन्य आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. न्यायालयात हजर केल्यानंतर माजी नगरसेवक आणि आरपीआयचा नेता प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सातपूर गोळीबार, अपहरण आणि खंडणीचा कट रचल्याप्रकरणी आहे लोंढेवर अनेक गुन्हा नोंद आहेत. सातपूर येथील एका बारमध्ये भूषण लोंढे याने गोळीबार केला होता. या बारमध्ये झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला होता. तर तक्रार दिल्याचा राग आल्यानं भूषण लोंढे याने हॉटेल मालकाच्या कुटुंबाचं अपहरण केलं होतं.

Nashik Crime
Navi Mumbai Airport : नवी मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण, PM नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या विमानतळाचं उद्घाटन, पाहा Inside Video

लोंढे पिता पुत्राला कोर्टात हजर केल्यानंतर धक्कादायक बाब उघडकीस आली. प्रकाश लोंढे हा आरपीआय आठवले गटाचा असून त्याच्याकडे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुखपद आहे. या प्रकरणात प्रकाश लोंढे, दीपक लोंढे अटकेत आहे. तर भूषण लोंढे मात्र अद्यापही फरार आहे. अपहरण झालेल्या कुटुंबाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Nashik Crime
Yogesh Kadam on Ghaywal Gang : गुंड घायवळच्या भावाला शस्त्र परवाना कुणी दिला? मंत्री योगेश कदम यांनी केला खुलासा

'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'

प्रकाश लोंढे हा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा निकटवर्तीय आहे. त्याच्यासह इतर काही कुख्यात गुंडांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांची धिंड काढून जनतेत भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या टोळ्यांना संदेश देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलाय. पोलिसांनी आज सकाळी सातपूर भागात मोठ्या बंदोबस्तात गुंडांची धिंड काढली. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला', अशा घोषणा देत पोलिसांनी कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com