
पनवेल महापालिकेने ८ कर्मचाऱ्यांची पदावनती
२१ जून २०२१ रोजीच्या शासन निर्णयाच्या आधारे कारवाई
या पदावनतीने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
पनवेल महापालिकेत कार्यरत असलेल्या ८ कर्मचाऱ्यांची पदानवती करण्यात आली आहे. पालिकेतील ७ वरिष्ठ लिपिकांची कनिष्ठ पदावर पदावनती करण्यात आली आहे. तर एका १ मुख्य स्वच्छता निरीक्षकाची ही स्वच्छता निरीक्षक पदावर पदावनती करण्यात आली आहे. पालिकेने २१ जून २०२१ रोजीच्या अधिसूचनेनुसार कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. पालिकेच्या या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा आहे.
पालिकेचा शासन आकृतीबंध हा १०४२ पदांचा मंजूर आहे. आकृतीबंधमधील कर्मचाऱ्यांना सर्व पदोन्नती, अनुकंप, वेतनाचे लाभ मिळतात. आकृतीबंधमधील पदांच्या व्यतिरिक्त पदांना शासन निर्णयानुसार आधीसंख्य पद म्हणून ओळखले जातात. या आधीसंख्य पदांना अनुकंपा आणि पदोन्नती या सेवांचे लाभ देण्यात येत नाही. पनवेल महानगरपालिकेमध्ये ३२० कर्मचारी हे ३२० हे आधीसंख्य पदे आहेत.
पालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेचं आधीसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती न देण्याविषयी धोरण होतं. मात्र, पालिका कर्मचाऱ्यांकडून पदोन्नतीविषयी पालिका प्रशासनाला विचारणा केल्यानंतर उत्तर टाळण्यात आलं. मात्र, प्रशासनाने २१ जून २०२१ रोजीच्या शासन निर्णयाच्या आधारे कारवाईचे निर्देश दिले आहेत. या शासन निर्णयात १७ सेवा विषयी अटी आणि शर्तीचा उल्लेख आहे. त्यामधील मुख्य अट ही ग्राम पंचायतमधून समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांना पालिकेत सामावून घेऊन त्यांची पदनिर्मिती करणे आवश्यक आहे. त्यांना आवश्यक अशा पदाकरिता तांत्रिक अर्हता पूर्ण करणे अनिवार्य आहे.
समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांसमोर जात प्रवर्ग दर्शवण्यात आलेला असल्याने जातवैधता प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. तसेच जात प्रवर्गाच्या आधारे बिंदू नामावली तयार करून विभागीय मागासवर्ग आयोगाकडून तपासून मान्यता प्राप्त करायची असते. या सर्व अटी पूर्ण झाल्यावर समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाते.मात्र, पालिकेने अटी आणि शर्तीची पूर्तता न करता शासन निर्णय बाजूला ठेवून कारवाई सुरु करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाच्या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. पालिकेच्या या निर्णयाने पालिका प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.