Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

Deccan Chowpatty Fight Video: पुण्यातील डेक्कन परिसरातील नदीकाठच्या चौपाटीवर झालेल्या हाणामारीची घटना घडलीय. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
Deccan Chowpatty Fight Video
Tension at Pune’s Deccan Chowpatty as a late-night fight breaks out; police arrest three accused after viral video surfaces.saam tv
Published On
Summary
  • पुण्यातील डेक्कन नदीपात्रातील चौपाटीवर शनिवारी रात्री हाणामारीची घटना घडली.

  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये तणाव निर्माण झाला.

  • डेक्कन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील गुंडगिरी कमी होताना दिसत नाहीये. येथील गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाहीये. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात पुण्यातील नदी काठच्या चौपाटीवर तुंबळ हाणामारी झाली आहे. पुण्यातील डेक्कन परिसरातील नदीपात्रातील चौपाटीमध्ये मारामारीची घटना घडलीय.

शनिवारी रात्री डेक्कन चौपाटी येथे हाणामारी झाली असून त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या हाणामारी प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. यातील अजून काही आरोपींचा शोध सुरू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार किरकोळ वादावरून हाणामारीला झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com