rishabh pant kl rahul saam tv
Sports

IPL 2025 Auction: केएल राहुल ते रिषभ पंत.. या खेळाडूंना लय डिमांड; बेस प्राईज 2 कोटी, पाहा संपूर्ण यादी

IPL 2025 Mega Auction: आयपीएल २०२५ स्पर्धेतील मेगा ऑक्शनमध्ये २ कोटी रुपये बेस प्राईज असलेले खेळाडू कोणते? पाहा संपूर्ण यादी.

Ankush Dhavre

IPL 2025 Players Auction: आयपीएल २०२५ स्पर्धेच्या मेगा लिलावाचा बिगुल वाजला आहे. येत्या २४-२५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जैद्दामध्ये मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी जगभरातील एकूण १५७४ खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे. ज्यात एकापेक्षा एक स्टार खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान कोणते असे भारतीय खेळाडू आहेत, ज्यांची बेस प्राईज ही २ कोटी रुपये आहे? जाणून घ्या.

कोणत्या भारतीय खेळाडूंची बेस प्राईज २ कोटी रुपये?

मेगा लिलावासाठी नाव नोंदवण्यात आलेल्या कित्येक खेळाडूंनी आपली बेस प्राईज २ कोटी रुपये इतकी ठेवली आहे. ईएसपीएन क्रीकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, भारताचे स्टार खेळाडू केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी आपली बेस प्राईज २ कोटी रुपये ठेवली आहे.

श्रेयसने कोलकाता नाईट रायडर्सला गेल्या हंगामात चॅम्पियन बनवलं होतं, मात्र तरीही त्याला रिटेन करण्यात आलेलं नाही. तर केएल राहुलला लखनऊ सुपर जायंट्सने रिलीज केलंय आणि रिषभनेही दिल्लीची साथ सोडली आहे.

या स्टार खेळाडूंसह आर अश्विन, मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहल यांची बेस प्राईज देखील २ कोटी रुपये असणार आहे. गेल्या हंगामात सुपर फ्लॉप राहिलेल्या पृथ्वी शॉला दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलं आहे. त्याने आपली बेस प्राईज ७५ लाख रुपये ठेवली आहे.

२ कोटी रुपये बेस प्राईज असलेले भारतीय खेळाडू

रिषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, आर अश्विन, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, खलील अहमद, दीपक चाहर, व्यंकटेश अय्यर, आवेश खान, ईशान किशन, मुकेश कुमार, भुवनेश्वर कुमार, क्रुणाल पंड्या, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज और उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा, टी नटराजन, देवदत्त पडिक्कल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT