४ सामने, ३ वेळा शून्यावर बाद; Shreyas Iyer साठी कसोटी संघाचे दार बंद?

Shreyas Iyer News In Marathi: भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला कसोटी संघात स्थान मिळणं कठीण झालंय आता.
४ सामने, ३ वेळा शून्यावर बाद; Shreyas Iyer साठी कसोटी संघाचे दार बंद?
shreyas iyertwitter
Published On

भारतीय संघातील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी जोरदार प्रयत्न करतोय. मात्र त्याचा फॉर्म साथ देत नाहीये. रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत मुंबईचा संघ बडोदा संघाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यात फलंदाजी करताना श्रेयस अय्यर पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यरला भार्गव भट्टने बाद करत माघारी धाडलं. श्रेयस अय्यर शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ड गटाकडून खेळताना तो २ वेळेस शून्यावर बाद झाला होता.

गेल्या ४ सामन्यातील रेकॉर्ड पाहिला, तर ३ वेळेस तो शून्यावर बाद झाला आहे. अय्यरने आपल्या कसोटी कारकिर्दीला जोरदार सुरुवात केली होती. त्याने २०२१ मध्ये पदार्पण केलं. दरम्यान शतकी खेळीसह पदार्पण करणाऱ्या अय्यरला सातत्य टिकवून ठेवता आलेलं नाही.

४ सामने, ३ वेळा शून्यावर बाद; Shreyas Iyer साठी कसोटी संघाचे दार बंद?
IND vs BAN: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची Playing XI बदलणार; या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी

मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असली तरीदेखील कसोटी क्रिकेटमध्ये त्याला हवा तसा खेळ करता आलेला नाही. फॉर्ममध्ये असताना त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं होतं. त्यानंतर त्याने भारतीय संघात कमबॅक केलं, मात्र त्याला धावा करता आलेल्या नाही.

फॉर्ममध्ये सातत्य नसल्याने त्याचा भारतीय संघात कमबॅक करण्याची संधी आणखी दूर गेली आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याला भारतीय संघात संधी दिली गेली नव्हती. आता न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठीही त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलेली नाही.

४ सामने, ३ वेळा शून्यावर बाद; Shreyas Iyer साठी कसोटी संघाचे दार बंद?
IND vs BAN: शेवटच्या टी-२० सामन्यात टीम इंडियाची Playing XI बदलणार; या तिघांना संधी मिळणार

न्यूझीलंडविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com