IND vs BAN: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची Playing XI बदलणार; या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी

India vs Bangladesh 3rd T20I: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये आज शेवटचा सामना होणार आहे.
IND vs BAN: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची Playing XI बदलणार; या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी
team indiatwitter
Published On

India vs Bangladesh 3rd T20I, Team India Playing XI Prediction: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज रंगणार आहे. हा सामना हैदराबादमध्ये रंगणार आहे. भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकत टी-२० मालिकेत २- ० ने विजयी आघाडी घेतली आहे.

दरम्यान मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारतीय संघ ही मालिका ३-० ने आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

या मालिकेसाठी संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त तर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात युवा गोलंदाज मयांक यादव आणि नितीश कुमार रेड्डीला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली. या दोन्ही खेळाडूंनी पदार्पणात चांगली कामगिरी करुन दाखवली आहे.

IND vs BAN: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची Playing XI बदलणार; या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी
IND vs BAN: IPL गाजवणाऱ्या Harshit Ranaला टीम इंडियात संधी का मिळत नाहीये? समोर आलं मोठं कारण

या खेळाडूंना संधी मिळणार?

या मालिकेत आतापर्यंत २ सामने खेळले गेले आहेत. फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आणि हर्षित राणा अजूनही संधीच्या प्रतिक्षेत आहेत. हर्षित राणाला यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही भारतीय संघात संधी दिली गेली होती.

मात्र त्याला पदार्पणाची संधी दिली गेली नव्हती. दरम्यान तिसऱ्या सामन्यात त्याला पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. तसेच संजू सॅमसनला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये सलामीला फलंदाजी करण्याची संधी दिली गेली. मात्र त्याला या संधीचं सोनं करता आलेलं नाही. त्यामुळे त्यालाही या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते.

IND vs BAN: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची Playing XI बदलणार; या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी
IND vs BAN, 2nd T2OI: टीम इंडियाच्या विजयाची सप्तमी! बांगलादेशला नमवत मालिकेत घेतली २-० ची विजयी आघाडी

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश कुमार रेड्डी, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती/ रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मयांक यादव/ हर्षित राणा

बांगलादेश: परवेज हुसेन एमोन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदय, महमदुल्लाह, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, रिशद हुसेन, तस्कीन अहमद, तन्जीम हसन शाकिब, मुस्ताफिजुर रहमान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com