IPL 2025 Opening Ceremony (BCCI /X ) saam tv
Sports

IPL Opening Ceremony : आयपीएल उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडचा तडका, कोण-कोण येणार? कुठे बघाल लाइव्ह?

IPL 2025 Opening Ceremony update : इंडियन प्रीमिअर लीगच्या नव्या पर्वाला शनिवारपासून (22 मार्च) सुरुवात होत आहे. क्रिकेटच्या मैदानात फलंदाजांकडून चौकार-षटकारांची आतषबाजी होण्याआधीच बॉलिवूड कलाकारांचा जलवा बघायला मिळणार आहे. हा सोहळा लाइव्ह कुठे बघता येईल हे जाणून घेऊयात.

Nandkumar Joshi

आयपीएल २०२५ स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिलाच सामना गतवर्षीचा चॅम्पियन संघ कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन दिग्गज संघांमध्ये होणार आहे. कोलकाताच्या इडन गार्डन्सवर हा उद्घाटनाचा सामना रंगणार आहे. क्रिकेटच्या मैदानात चौकार-षटकारांची बरसात होण्याआधी बॉलिवूडचा तडका आणि ठुमक्यांनी उद्घाटन सोहळ्यात रंगत आणली जाणार आहे.

आयपीएलच्या १८ व्या पर्वाला सुरुवात होण्याआधी श्रेया घोषाल आणि करन औजला यांच्या परफॉर्मन्सनं प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे. याशिवाय बॉलिवूडची फिटनेस क्वीन दिशा पटानी ओपनिंग सेरेमनीला उपस्थिती लावणार आहे.

सलमान खान सुद्धा येणार?

मीडिया रिपोर्ट्समधील दाव्यानुसार, बॉलिवूड कलाकार श्रद्धा कपूर, वरूण धवन या ओपनिंग सेरेमनीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सलमान खान देखील सोहळ्याला उपस्थित राहू शकतो, असं सांगितलं जात आहे. सिकंदरच्या प्रमोशनसाठी तो जाऊ शकतो. ३० मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

डबल हेडर सामन्यांची मेजवानी

आयपीएलचे सर्व सामने एकूण १३ मैदानांवर खेळवले जाणार आहेत. त्यात १२ डबल हेडर सामन्यांची मेजवानी देखील आहे. फायनलचा सामना २५ मे रोजी कोलकाताच्याच ईडन गार्डन्सवर होणार आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील पहिला डबल हेडर २३ मार्चला खेळवला जाणार आहे. पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

LIVE मॅच कुठे बघता येईल?

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याला २२ मार्चला संध्याकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर हा सोहळा असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर हा सोहळा लाइव्ह बघता येणार आहे. जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवरही हा सोहळा पाहता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT