Virat Kohli throw cap In Anger 
Sports

Virat Kohli: रागाने लालबुंद झाला कोहली; फिल्डिंगवेळी वानखेडेच्या मैदानात फेकली कॅप Video व्हायरल

Virat Kohli throw cap In Anger: वानखेडे मैदानावर विराट कोहलीचा रौद्र अवतार पाहायला मिळाला. रागाच्या भरात कोहलीने मैदानात कॅप फेकत खेळाडूंवर राग व्यक्त केला. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Bharat Jadhav

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदा विराट कोहलीचा राग अनावर झाला. आपल्या फलंदाजीने चाहत्यांना खूश करणारा कोहली मुंबई विरुद्धच्या सामन्यात चांगलाच संतापला होता. विराट कोहलीच्या संतापाचं कारण होतं, आरसीबीच्या खेळाडूंची मिस फिल्डिंग.

मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२५ च्या २० व्या सामन्यात विराट कोहली संतापला होता. आधी जेव्हा त्याची विकेट पडली होती, त्यावेळी त्याने ड्रेसिंग रूममध्ये बॅट फेकून आपला राग व्यक्त केला होता. क्षेत्ररक्षण करताना कोहली दुसऱ्यांदा संतापला होता. आरसीबीच्या खेळाडूने केलेली चूक पाहून कोहली रागवला. त्यावेळी त्याने त्याची टोपी जमिनीवर फेकली.

दोन खेळाडूंची टक्कर

वानखेडे मैदानावर विराट कोहलीचा भयंकर राग पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना यश दयाल १२ वं षटक टाकत होता. यश दयालच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने फटका मारला. यशला झेल घेण्याची संधी होती, पण यष्टीरक्षक जितेश शर्माही झेल घेण्यासाठी धावला. झेल घेण्याच्या प्रयत्नात दोन्ही खेळाडूंमध्ये टक्कर झाली, त्यामुळे दोघांच्या हातातून झेल निसटला.

रागाच्या भरात मैदानावर फेकली टोपी

चेंडू उंच हवेत असताना यष्टीरक्षक जितेश झेल घेण्यासाठी प्रयत्न करत होता. पण यशने त्याला थांबण्यास सांगितलं. पण त्याने यशचं ऐकलं नाही. त्याच गोंधळात दोन्हांची टक्कर झाली. दोन्ही खेळाडूंमधील हा गोंधळ पाहून विराट कोहली खूप संतापला. त्याने रागाच्या भरात आपल्या डोक्यावरील टोपी काढली आणि जमिनीवर फेकली.

आरसीबीच्या खेळाडूंकडून झेल निसटला तेव्हा त्यावेळी सूर्यकुमार हा २७ धावांवर खेळत होता. सूर्यकुमार हा २७ धावांवर माघारी परतला असता पण,आरसीबी खेळाडूंच्या गोंधळामुळे त्याला जीवनदान मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Infertility treatment: गर्भधारणेमध्ये अडथळा येत असलेल्या महिलांसाठी 'ही' थेरेपी ठरेल आशेचा किरण; पाहा काय आहे ही थेरेपी?

Denver Airport Incident : १७३ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानाच्या लँडिंग गियरला आग, अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली | Video

SCROLL FOR NEXT