Axar Patel MI VS DC IPL 2025 X
Sports

Mumbai Indians चा फायदा, दिल्लीला टेन्शन; अक्षर पटेल सामन्यात गैरहजर का? कारण आलं समोर

MI Vs DC IPL 2025 : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने आले आहेत. आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल सहभागी झालेला नाही. त्याच्या जागी फाफ डु प्लेसिसकडे कर्णधारपदाची जबाबदारी आहे.

Yash Shirke

IPL 2025 मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना सध्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. हा सामना मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जर हा सामना मुंबईने जिंकला, तर मुंबई प्लेऑफमध्ये जाईल. दुसऱ्या बाजूला दिल्लीने हा सामना जिंकल्यास ते प्लेऑफच्या स्पर्धेत टिकून राहतील.

दिल्ली कॅपिटल्स कर्णधार अक्षर पटेल आजारी आहे. त्यामुळे त्याची जागी आजच्या सामन्या उपकर्णधार फाफ डु प्लेसिसकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. टॉससाठी देखील फाफ आला होता. फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईचे सलामीवीर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले.

अक्षरच्या तब्येतीची माहिती देताना फाफ डु प्लेसिस म्हणाला, 'मागील दोन दिवसांपासून अक्षर पटेल खूप आजारी आहे. तो फ्लू झाला आहे. अक्षर लवकर बरा व्हावा अशी आम्ही अपेक्षा करत आहोत. त्याने या सीझनमध्ये दिल्लीसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आजच्या सामन्यात त्याची आठवण नक्कीच येईल.'

अक्षर पटेलने दिल्लीसाठी उत्तम खेळी केली आहे. गोलंदाजीसह फलंदाजीमध्येही अक्षरने मौल्यवान योगदान दिले आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेल नसल्याने दिल्लीचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११

फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अभिषेक पोरेल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, ट्रिस्टन स्टब्स, दुष्मंथा चमीरा, विपराज निगम, माधव तिवारी, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, मुकेश कुमार

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११

रायन रिकल्टन, रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

SCROLL FOR NEXT