ipl auction twitter
क्रीडा

IPL 2025 Auction: आयपीएल लिलावाची तारीख ठरली! जाणून घ्या केव्हा अन् कुठे होणार?

IPL 2025 Date And Auction: आयपीएल २०२५ स्पर्धेच्या लिलावाची तारीख आणि ठिकाण ठरलं आहे.

Ankush Dhavre

IPL 2025 Date: आयपीएल २०२५ स्पर्धेसाठीचं ऑक्शन केव्हा आणि कुठे होणार याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. आयपीएल ऑक्शनच्या तारखेबाबत आणि वेन्यूबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल स्पर्धेचे ऑक्शन नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी रियादमध्ये आयोजित केले जाऊ शकते. काही दिवसांपुर्वीच सर्व फ्रेंचायझींनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, हे ऑक्शन २४ आणि २५ नोव्हेंबर रोज आयोजित केले जाऊ शकते. या लिलावात मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी आपल्या संघातील सर्व स्टार खेळाडूंना रिटेन केलं आहे.

तर पंजाब किंग्जने केवळ शशांक सिंग आमि प्रभसिमरन सिंग यांना रिटेन केलं आहे. त्यामुळे पंजाबकडे सर्वाधिक ११० कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे पंजाब किंग्जचा संघ हवा तो खेळाडू संघात घेण्यासाठी मोठी बोली लावू शकतो.mE

आगामी हंगामापूर्वी सर्व संघांनी काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. जोस बटलर श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्सवेल, केएल राहुल आणि रिषभ पंतसारख्या स्टार खेळाडूंना रिलीज करण्यात आलं आहे.

सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

मुंबई इंडियन्स - हार्दिक पंड्या (१६.३५ कोटी), रोहित शर्मा (१६.३० कोटी), सूर्यकुमार यादव (१६.३५ कोटी), जसप्रीत बुमराह (१८ कोटी), तिलक वर्मा (८ कोटी)

चेन्नई सुपर किंग्ज - ऋतुराज गायकवाड (१८ कोटी), मथीशा पथिराना (१३ कोटी), शिवम दुबे (१२ कोटी), रविंद्र जडेजा (१८ कोटी), एमएस धोनी (४ कोटी)

कोलकाता नाईट रायडर्स - रिंकू सिंह (१३ कोटी), वरुण चक्रवर्ती (१२ कोटी), सुनील नरेन (१२ कोटी), आंद्रे रसेल (१२ कोटी), हर्षित राणा (४ कोटी), रमनदीप सिंह (४ कोटी)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

विराट कोहली (२१ कोटी), रजत पाटीदार (११ कोटी), यश दयाल (५ कोटी)

दिल्ली कॅपिटल्स - कुलदीप यादव (१३.२५ कोटी), अक्षर पटेल (१६.५० कोटी), ट्रिस्टन स्टब्ज (१० कोटी), अभिषेक पोरेल (४ कोटी)

लखनऊ सुपर जायंट्स - निकोलस पुरन (२१ कोटी), रवी बिश्नोई (११ कोटी), मयांक यादव (११ कोटी), मोहसिन खान (४ कोटी), आयुष बदोनी (४ कोटी)

सनरायझर्स हैदराबाद - पॅट कमिन्स (१८ कोटी), अभिषेक शर्मा (१४ कोटी), नितीश कुमार (६ कोटी), हेनरिक क्लासेन (२३ कोटी), ट्रेविस हेड (१४ कोटी)

राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन (१८ कोटी), यशस्वी जयस्वाल (१८ कोटी), रियान पराग (१४ कोटी), शिमरन हेटमायर (११ कोटी), ध्रुव जुरेल (१४ कोटी), संदीप शर्मा (४ कोटी)

पंजाब किंग्ज - शशांक सिंह (५.५ कोटी), प्रभासिमरन सिंह (४ कोटी)

गुजरात टायटन्स- शुभमन गिल, राशिद खान, साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump Net Worth: अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्ती किती?

ICC Test Ranking: मालिका गमावताच ICC चा टीम इंडियाला दणका! Ranking मध्ये मोठी घसरण; विराट- रोहित टॉप 20 मधून बाहेर

Manoj Jarange Patil : मतदान करा पण पाडापाडी कराच; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन

Maharashtra News Live Updates: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं सोलापूर शहरात आगमन

Pune Politics: पुण्यातील कॅन्टोन्मेंटमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस सामना, कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT