आयपीएल 2025 पूर्वी संघातील बदलांच्या चर्चांनी जोर धरलाय. मेगा लिलावात अनेक खेळाडूंच्या संघात बदल होऊ शकतात. खेळाडू्ंच्या संघ बदलापूर्वी प्रशिक्षक बदलाचे सत्र सुरू झाले आहे. यात दिल्ली कॅपिटल्सने रिकी पाँटिंग बाहेर केले आहे. पाँटिंग दीर्घकाळपासून दिल्ली संघाच्या प्रशिक्षकपदी होता. आता दिल्लीपाठोपाठ आता पंजाब किंग्जचा संघही आपला प्रशिक्षक बदलण्याच्या विचारात आहे. रिकी पाँटिंगनंतर आयपीएलमधील आणखी एका ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचा प्रवास संपणार असल्याचं म्हटलं जात आहे.
पंजाब किंग्ज मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांची सुट्टी करणार असल्याचं सांगितलं जात आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंट पंजाब किंग्ज संघाची मालकीण आहे. बेलिसचा पंजाबच्या संघासोबत दोन वर्षांचा करार होता, हा करार आता संपुष्टात आलाय. तसेच फ्रँचायझी तो वाढवण्याची शक्यता कमी आहे. पंजाबचा संघ 2014 पासून प्ले ऑफमध्ये पोहोचलेला नाहीये. त्यामुळे संघ नवीन प्रशिक्षक शोधणार असल्याचं म्हटलं जात आहे.
बेलिसचा खराब रेकॉर्ड
61 वर्षीय ट्रेव्हर बेलिसने आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या फ्रँचायझींसोबत काम केलंय. पंजाब किंग्जपूर्वी ते कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक होते. गेल्या पाच वर्षांतील टी-20 स्पर्धांमध्ये त्यांचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. सनरायझर्स हैदराबाद, सिडनी थंडर आणि पंजाब किंग्जसोबत त्याची कामगिरी चांगली राहिली नाहीये.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, पंजाब संघ भारतीय प्रशिक्षकाच्या शोधात आहेत. पण ते भारतीय प्रशिक्षकाची निवड करतील की नाही हे अद्याप ठरलेले नाहीये. मात्र पंजाबचा संघ अनेक पर्यायांवर विचार करत असून यात संजय बांगर यांचे नाव आघाडीवर आहे. संजय बांगर हे यापूर्वी या फ्रँचायझीचे मुख्य प्रशिक्षक होते. आता ते सध्या ते क्रिकेट विकास संचालक आहेत. दरम्यान २२ जुलै रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार होता, मात्र बैठक होऊ शकली नाही. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी फ्रेंचायझी इतर नावांबाबत विचारविमर्श करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
भारतीय प्रशिक्षकाची मागणी वाढली
आयपीएलमध्ये भारतीय प्रशिक्षकांची खूप चर्चा आहे. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला. आता राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक होऊ शकतो. गौतम गंभीरनेही कोलकाता नाईट रायडर्सला यंदाच्या आयपीएल हंगामात चॅम्पियन बनलं. केकेआरचा प्रशिक्षक चंद्रकांत पंडित होता तर गंभीर संघाचा मार्गदर्शक होता.
गंभीर आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनलाय. तर आशिष नेहराने 2022 मध्ये गुजरात टायटन्सला आयपीएल चॅम्पियन बनवले. 2023 मध्ये त्यांना अंतिम फेरीत नेले. सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत राहील आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने आगामी हंगामासाठी आपल्या कोचिंग स्टाफमध्ये दिनेश कार्तिकचा समावेश केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.