वर्ल्डकप २०२३ साठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ यंदाचा वर्ल्डकप जिंकून पुन्हा इतिहास घडवेल, अशी अपेक्षा कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना आहे. पण ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच एक धक्कादायक वृत्त धडकलं आहे. वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियात मोठ्या घडामोडी घडू शकतात, असं मानलं जात आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड वर्ल्डकप २०२३ नंतर पद सोडू शकतात. वर्ल्डकप स्पर्धेनंतर बीसीसीआयसोबतचा करार संपुष्टात येणार आहे. अशावेळी बीसीसीआयकडून पुन्हा नव्या मुख्य प्रशिक्षकांसाठी शोध सुरू होणार आहे. (Latest News On World Cup)
जर यजमान भारतीय संघ वर्ल्डकप जिंकल्यास समीकरणं बदलू शकतात. राहुल द्रविडही त्यांचा 'प्लान' बदलू शकतात, अशी चर्चा आहे. द्रविड यांनी बीसीसीआयसोबत केलेला करार संपुष्टात येणार आहे. मात्र, कसोटी क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी कायम राहू शकतात. तर द्रविडनंतर आशिष नेहरा हा प्रशिक्षकपदासाठी पर्याय असू शकतात. (Latest Marathi News)
याशिवाय टीम इंडियातील काही अनुभवी खेळाडूंची ही अखेरची स्पर्धा असू शकते, असंही मानलं जात आहे.
एका माजी क्रिकेटपटूच्या निकटवर्तीय सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, 'भारतानं वर्ल्डकप जिंकला तरीही, राहुल द्रविड स्वतःच करार वाढवून घेणार नाहीत. यशाच्या शिखरावर असतानाच आपला प्रवास थांबवावा अशी त्यांची इच्छा आहे.'
वर्ल्डकपनंतर बीसीसीआयनं गंभीर पावलं उचलली पाहिजेत. प्रत्येक फॉरमॅटसाठी स्वतंत्र प्रशिक्षक नेमण्याचा विचार करायला हवा. राहुल द्रविड यांच्याकडे कसोटी क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी कायम ठेवली पाहिजे, असंही सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं.
माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनंतर राहुल द्रविड यांची नेमणूक करण्यात आली. द्रविड यांना मोठ्या स्पर्धांमध्ये अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. मात्र, काही स्पर्धांसाठी त्यांनी घेतलेले निर्णय चर्चेचा विषय ठरले होते. त्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आर अश्विनला संघातून वगळण्याचा निर्णय सर्वाधिक चर्चिला गेला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.