delhi capitals yandex
Sports

IPL 2025: आयपीएल गाजवलेले हे 3 खेळाडू लिलावात अन्सोल्ड जाणार; Base Price ही मिळणं कठीण

IPL 2025 Mega Auction: येत्या २४- २५ नोव्हेंबरला आयपीएलचा लिलाव होणार आहे.

Ankush Dhavre

IPL 2025 Auction News In Marathi: आयपीएल २०२५ स्पर्धेच्या लिलावाबाबत एकमोठी मोठी अपडेट समोर आली आहे. या लिलावात ११६५ भारतीय खेळाडूंनी तर ४०९ परदेशी खेळाडूंनी लिलावात सहभाग घेतला आहे. ज्यात ११२४ अन्कॅप्ड आणि ३२० कॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे.

दरम्यान आम्ही तुम्हाला अशा ३ खेळाडूंबद्दल माहीती देणार आहोत, ज्याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली, मात्र यावेळी रिकाम्या हातीच परतावं लागेल.

अमित मिश्रा:

अमित मिश्रा गेल्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसून आला होता. आगामी हंगामापूर्वी लखनऊने त्याला रिलीझ केलं आहे. दरम्यान आगामी हंगामात कुठलाही संघात त्याला आपल्या संघात घेण्याची शक्यता खूप कमी आहे. अमित मिश्राच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १६२ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना १७४ गडी बाद केले आहेत.

पृथ्वी शॉ

युवा आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉला दिल्ली कॅपिटल्सने रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन्ही हंगामात तो सुपरफ्लॉप ठरला आहे. त्यामुळे दिल्लीने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. माध्यमातील वृत्तानुसार त्याची बेस प्राईज ७५ लाख रुपये असणार आहे. आता कोणता संघ त्याला आपल्या संघात घेणार हे, पाहणं महत्वाचं ठरणार आहे.पृथ्वी शॉ च्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत एकूण ७९ सामन्यांमध्ये १८९२ धावा केल्या आहेत.

मनीष पांडे

मनीष पांडे हा या स्पर्धेतील अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. मात्र त्याला आपल्या संघाने रिलीज केलं आहे. गेल्या काही महिन्यात त्याच्या कामगिरीची आलेख सातत्याने खालीच जात आहे. त्यामुळे आगामी हंगामात त्याला खरीरदार मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. मनीष पांडेच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर या स्पर्धेत त्याने १७२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला ३८५० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि २२ अर्धशतकं झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT