arjun tendulkar twitter
Sports

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर KKR कडून खेळणार? मुंबईसह हे 2 संघ लावू शकतात मोठी बोली

Arjun Tendulkar, IPL 2025 Mega Auction: आगामी आयपीएल हंगामापूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्ससह आणखी २ संघ मोठी बोली लावू शकतात.

Ankush Dhavre

Arjun Tendulkar, IPL 2025 Mega Auction: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर गेल्या २ हंगामांपासून मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतोय. मुंबईने बेस प्राईजवर त्याला आपल्या संघात स्थान दिलं. यादरम्यान त्याला पदार्पणाची संधीही दिली.

मात्र आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र गेल्या दोन्ही हंगामातील रेकॉर्ड पाहिला, तर मुंबई इंडियन्स पुन्हा अर्जुनला आपल्या ताफ्यात घेणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र यावेळी केवळ मुंबई इंडियन्स नव्हे, तर आणखी काही संघ त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी जोर लावू शकतात. कोणते आहेत ते संघ? जाणून घ्या.

गुजरात टायटन्स

अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या प्लेइंग ११ मध्ये सातत्याने संधी दिली जात नाहीये. तर दुसरीकडे गुजरातचा हेड कोच आशीष नेहरा अशा खेळाडूंना संधी देतो, ज्यांना जास्त संधी मिळत नाहीये. नेहराने मोहित शर्मावर विश्वास दाखवला होता. हा विश्वास त्याने सार्थ ठरवत दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे यावेळी गुजरातचा संघ अर्जुनला आपल्या संघात घेण्यासाठी जोर लावू शकतो.

चेन्नई सुपर किंग्ज

चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनीने अनेक खेळाडूंना घडवलं आहे. ज्यात दिपक चाहरसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी तो कदाचित आपल्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचं हंगाम खेळणार आहे. त्यामुळे जर चेन्नईने अर्जुनला आपल्या संघात घेतलं, तर हे अर्जुनसाठी चेन्नई सुपर किंग्ज संघासाठीही फायद्याचं ठरेल.

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्सने गेल्या वर्षी आयपीएलची ट्रॉफी उंचावली होती. यावेळी चंद्रकांत पंडीत हे प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार आहेत. त्यांनी देखील अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. मुख्य बाब म्हणजे शाहरुख खान आणि सचिन तेंडुलकर हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT