rohit sharma saam tv
Sports

Mumbai Indians Captain: हार्दिक नव्हे, तर रोहित होणार मुंबईचा कर्णधार? पंड्याला संघातही जागा मिळणार नाही

Mumbai Indians Captain In MI vs CSK Match: आयपीएल २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध होणार आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेतील पहिला सामना २२ मार्चला गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

त्यानंतर २३ मार्चला ५ वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स आणि ५ वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज संघ मैदानात उतरणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.

हार्दिक पंड्या पहिल्या सामन्याला मुकणार?

आयपीएल २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकला नव्हता. या हंगामातील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिकवर ३० लाखांचा दंड आकारला गेला होता, तर एक सामना खेळण्यावर बंदीही घातली गेली होती.

याच कारणामुळे तो आयपीएल २०२५ स्पर्धेतील पहिला सामन्यात खेळताना दिसून येणार नाही. मुंबईचा पहिला सामना चेन्नईविरुद्ध होणार आहे. त्यानंतर २९ मार्चला गुजरातविरुद्ध होणाऱ्या सामन्यात हार्दिक कमबॅक करताना दिसेल.

आयपीएलकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस रिलिझमध्ये म्हटले गेले होते की,' मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्यावर, १७ मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर लखनऊ सुपर जायटंस् विरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई करण्यात आली आहे. हार्दिक पंड्यावर ३० लाखांचा दंड आकारण्यात आला. यासह पुढील सामना खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.'

हार्दिकच्या अनुपस्थितीत कोण होणार कर्णधार?

मुंबई इंडियन्स संघात अनेक स्टार खेळाडूंची भरमार आहे. गेल्या हंगामात रोहित शर्माला कर्णधारपदावरुव काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली होती. हार्दिक जर बाहेर बसला, तर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहसारखे अनुभवी खेळाडू आहेत, जे ही जबाबदारी खांद्यावर घेऊ शकतात. जसप्रीत बुमराह भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. तर सूर्यकुमार यादव टी-२० संघाचा कर्णधार आहे. रोहित शर्मा वनडे संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे या तिघांपैकी कुठलाही खेळाडू कर्णधारपदाची जबाबदारी घेऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

SCROLL FOR NEXT