Champions Trophy: हे सुधरणार नाहीत.. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पेटला नवा वाद; पाकिस्तानकडून भारताचा अपमान? -VIDEO

No Flag At Gaddafi Stadium For ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडियममध्ये ओपनिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यादरम्यान भारताचा झेंडा नसल्याचं दिसून आलं.
Champions Trophy: हे सुधरणार नाहीत.. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पेटला नवा वाद; पाकिस्तानकडून भारताचा अपमान? -VIDEO
pakistantwitter
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्ताकडे असले तरीदेखील बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास विरोध केला होता. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये करण्यात आले आहे. इतर सर्व संघांचे सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत.

तर भारतीय संघाचे दुबईत खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघातील खेळाडू दुबईत दाखल झाले आहेत. रविवारी भारतीय खेळाडू सराव करण्यासाठी मैदानात उतरले होते. रविवारी पाकिस्तानातील गद्दाफी स्टेडियममध्ये या स्पर्धेचा ओपनिंग सोहळा पार पडला.

Champions Trophy: हे सुधरणार नाहीत.. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पेटला नवा वाद; पाकिस्तानकडून भारताचा अपमान? -VIDEO
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीत धावांचा पाऊस पडणार की भारतीय गोलंदाज चमकणार? खेळपट्टी कोणाला देणार साथ?

या ओपनिंग सोहळ्यातील एक व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत एकूण ८ संघ खेळताना दिसून येणार आहेत. त्यामुळे गद्दाफी स्टेडियममध्ये ८ झेंडे लावणं अपेक्षित होतं. मात्र गद्दाफी स्टेडियमवर केवळ ७ झेंडे दिसून आले. भारताचा तिरंगा लावण्यात आला नव्हता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

Champions Trophy: हे सुधरणार नाहीत.. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पेटला नवा वाद; पाकिस्तानकडून भारताचा अपमान? -VIDEO
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीत धावांचा पाऊस पडणार की भारतीय गोलंदाज चमकणार? खेळपट्टी कोणाला देणार साथ?

भारताने केला विरोध

ज्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेची घोषणा करण्यात आली, तेव्हापासूनच बीसीसीआय भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्याच्या विरोधात आहे. हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येत असतात. यावेळीही बीसीसीआयने पाकिस्तानात येऊन खेळण्यास स्पष्ट नकार कळवला. त्यामुळे पाकिस्तानला ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवावी लागली.

एका युजरने पोस्ट शेअर करत लिहिले की, ' कराचीत भारतीय झेंड्याला स्थान नाही...भारतीय संघाने सुरक्षेचं कारण देऊन पाकिस्तानात येण्यास नकार दिला,त्यामुळे त्यांनी पाकिस्तानात येऊन चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास नकार दिला. त्यामुळेच पीसीबीने इतर सर्व देशांचे झेंडे ठेवले, तर भारतीय संघाचा झेंडा लावला नाही.'

२३ फेब्रुवारीला रंगणार महसंग्राम

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना २३ फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर २ मार्चला भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com