Shubman Gill Dating  X
Sports

शुबमनचं सारासोबत ब्रेकअप? चर्चांना उधाण; पण गिलने डेटिंग लाईफवर दिली मोठी अपडेट, म्हणाला, 'मी ३ वर्षांपासून...'

Shubman Gill Dating : सारा तेंडुलकरशी शुबमन गिलचे नाव जोडण्यात आले होते. त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. आता डेटिंगच्या चर्चांवर शुबमनने खुलासा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

IPL 2025 च्या पॉईंट्स टेबलवर सध्या गुजरात टायटन्सचा संघ टॉपवर आहे. युवा शुबमन गिलच्या नेतृत्त्वामध्ये गुजरातच्या संघाने यंदाच्या सीझनमध्ये कमाल कामगिरी केली आहे. गुजरातने एकूण आठ सामने खेळले आहेत, यातील सहा सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. फक्त दोन सामने गुजरातने गमावले आहेत.

सोमवारी (२१ एप्रिल) झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्याच्या टॉसदरम्यान शुबमनला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. डॅनी मॉरिसन यांनी शुबमनकडे पाहून 'छान दिसतोय. लग्न करायचा काही प्लान आहे का? असा प्रश्न विचारला होता. तेव्हापासून गिलच्या लग्नाच्या, डेटिंग लाईफबद्दलच्या चर्चांना उधाण आले. शुबमनचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गिलने डेटिंग लाईफबद्दल माहिती दिली.

'मागील ३ वर्षांपासून मी सिंगल आहे. वेगवेगळ्या मुलींशी माझे नाव जोडले जात आहे. लोक ज्यांच्याशी माझे नाव जोडतात, मी माझ्या उभ्या आयुष्यात त्यांना मी उभ्या आयुष्यात भेटलेलो नसतो. हे फार भयंकर. मी अमुक व्यक्तीसोबत आहे, या तमुक व्यक्तीसोबत कुठे असेन अशा अफवा मला ऐकू असतात', असे शुबमनने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

शुबमन गिल म्हणाला, 'करियरमध्ये कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे हे मला ठाऊक आहे. एखाद्या व्यक्तीसोबत वर्षातील ३०० दिवस राहायला माझ्याकडे वेळ नाहीये. आपण कुठेतरी प्रवास करत आहोत. तेव्हा कोणासोबत राहण्यासाठी, त्यांच्यासोबतच नातं खुलण्यासाठी जो वेळ लागतो, तो माझ्याकडे नाहीये.' दरम्यान हा व्हायरल झालेला व्हिडीओ फेक किंवा खोटा असल्याचा दावा केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT