PBKS Vs RCB IPL 2025 Final  x
Sports

IPL 2025 Final : फायनलमध्येही पावसाची बॅटिंग? पंजाब की बंगळुरू, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण ट्रॉफी जिंकणार?

PBKS Vs RCB IPL 2025 Final : नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही अंतिम सामन्यातील लढत रंगणार आहे. पण पावसामुळे सामना रद्द झाला, तर काय होणार? कोणाकडे ट्रॉफी जाणार? वाचा

Yash Shirke

IPL 2025 चा अंतिम सामना गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन संघ फायनलमध्ये आमनेसामने येणार आहेत. बंगळुरूने २०१६ मध्ये, तर पंजाबने २०१४ मध्ये अंतिम सामना खेळला होता. दोन्हीही संघ पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत.

काल (१ जून) मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या क्वालिफायर २ सामन्यात पाऊस पडला होता. पावसामुळे ७.३० वाजता सुरु होणारा सामना ९.४५ ला सुरु झाला होता. आता उद्या देखील (३ जून) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे खेळ बिघडल्यास काय होईल? चला जाणून घेऊयात...

फायनलमध्ये पाऊस पडला तर...

जर आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पाऊस पडला, तर दुसऱ्या क्वालिफायर सामन्याप्रमाणे, सामन्यासाठी १२० मिनिटांचा अतिरिक्त कालावधी उपलब्ध केला जाईल. तर पाऊस थांबलाच नाही आणि सामना रद्द करावा लागला, तर बुधवारी (४ जून) म्हणजेच रिझर्व्ह डेला हा सामना खेळवला जाईल. जर ४ जून रोजीही पावसामुळे सामना रद्द झाला तर पॉईंट्स टेबलवर टॉपवर असणाऱ्या पंजाबच्या संघाला आयपीएल २०२५ चे विजेतेपद मिळेल.

पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरू या दोन्ही संघांनी यंदाच्या सीझनमध्ये शानदार खेळ केला आहे. पॉईंट्स टेबलवर पंजाबचा संघ पहिल्या, तर बंगळुरूचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. २००८ पासून दोन्ही संघ आयपीएल जिंकण्यासाठी पर्यंत करत आहेत. आता १८ वर्षांनी या संघांना आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याची संधी मिळाली आहे. यात कोणता संघ बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसेच्या दिपोत्सवाला जाताना ठाकरे बंधूंचा एकाच कारमधून प्रवास

Raj Thackeray :...अन् राज ठाकरेंनी स्वत: हाती घेतलं कारचं 'स्टीअरिंग', दीपोत्सवातील ठाकरे बंधूंचा 'तो' व्हिडिओ चर्चेत

Saturday Horoscope: धनत्रयोदशीला 4 राशींचे भाग्य उजळणार, कामाच्या ठिकाणी बढतीचे योग, वाचा शनिवारचे राशीभविष्य

धक्कादायक! आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यानं आयुष्य संपवलं, १० दिवसात ३ पोलिसांची आत्महत्या

Chhagan Bhujbal : अधिकार की लढाई में निमंत्रण नही भेजे जाते; छगन भुजबळांनी कुणावर साधला निशाणा? VIDEO

SCROLL FOR NEXT