अहमदाबाद स्टेडियममध्ये काल मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना रंगला. या सामन्यात गुजरातने दमदार खेळ करत ३६ धावांनी विजय मिळवला. चेन्नईनंतर गुजरातकडून पराभव झाल्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या काहीसा नाराज दिसला. हार्दिकने एकाच वेळी निराशा आणि राग व्यक्त केला. कोणाचेही नाव न घेता त्याने खेळाडूंमध्ये प्रोफेशनलिज्मतेची कमतरता असल्याचे म्हटले.
हार्दिकने रोहित शर्मावर निशाणा साधला?
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. गुजरात विरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने ८ धावा केल्या. दोन्ही सामन्यात रोहित फेल झाला. 'हा आयपीएलच्या सुरुवातीचा टप्पा आहे. पण फलंदाजांना यापुढे चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तसं ते करतील अशी माझी आशा आहे', असे हार्दिक पंड्या म्हणाला.
'आमच्याकडूनही काही चुका झाल्या, आम्ही मैदानात प्रोफेशनलिज्म दाखवले नाही. कदाचित त्यामुळेच आम्ही २०-२५ धावा गमावल्या. गुजरातच्या संघाने पॉवरप्लेमध्ये योग्य खेळ केला. ते जोखमी न घेता सावधगिरीने खेळले नाही. त्यांनी पटापट खूप धावा केल्या आणि आमच्यावर दबाव आणला. त्यामुळे आम्ही बॅकफूटवर आणले', असे वक्तव्य मुंबईच्या कर्णधाराने केले. यावरुन हार्दिकने रोहितला अप्रत्यक्षपणे टोमणा मारल्याचे म्हटले जात आहे.
सामन्यात काय घडलं?
गुजरात टायटन्सकडून शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी डावाची सुरुवात केली. पॉवरप्लेनंतर संघाने ६६ धावा जमवल्या. कर्णधार शुबमन गिलने ३८ धावा करून माघारी परतला, तर जॉस बटलरने ३९ धावा फटकावल्या. साई सुदर्शनने सर्वाधिक ६३ धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले. मात्र, शाहरुख खान बाद झाल्यानंतर गुजरातच्या फलंदाजीत थोडी पडझड झाली. तरीही संघाने निर्धारित २० ओव्हर्स १९६ धावांचा भक्कम स्कोअर उभारला.
विजयासाठी १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन लवकरच बाद झाले, ज्यामुळे संघावर दडपण आले. मधल्या फळीत तिलक वर्माने संयमी खेळ करत ३९ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ४८ धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, तर हार्दिक पंड्या फक्त ११ धावा करून माघारी परतला. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा डाव पूर्णतः कोसळला आणि संघाला ३६ धावांनी पराभव पत्करावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.