
सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हा सामना विशाखापट्टणममध्ये रंगला आहे. या सामन्यामध्ये टॉस जिंकून हैदराबादने प्रथम फलंदाजी केली. हैदराबादचा अनिकेत वर्मा या सामन्यामध्ये चमकला. बाकीचे फलंदाज अपयशी ठरत असताना त्याने एका बाजूने लढा दिला. अनिकेतच्या खेळासोबत त्याच्या विकेटची देखील सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
अनिकेत वर्मा खेळत असताना १५ व्या ओव्हरमध्ये कुलदीप यादव बॉलिंग करण्यासाठी आला. ओव्हरच्या पाचव्या बॉलवर अनिकेतने जोरात शॉट मारला. बॉल सीमेपार जाऊन षटकार होणार इतक्यात तेथे फिल्डिंग असणाऱ्या जेक फ्रेझर-मॅकगर्कने जोरात उडी मारली आणि दोन्ही हात वर नेत हवेतच कॅच पकडला. जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या कौशल्यामुळे दिल्लीसाठी डोकेदुखी ठरत असलेला अनिकेत वर्मा कॅचआउट झाला.
जेक फ्रेझर-मॅकगर्कने पकडेल्या कॅचची चर्चा सर्वत्र होत आहे. सोशल मीडियावर या कॅचचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कॅचमुळे इन-फॉर्म अनिकेत वर्मा बाद झाला. अनिकेत वर्माने हैदराबादकडून खेळताना आजच्या सामन्यात ४१ बॉल्सवर ७४ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे सनरायजर्स हैदराबादची धावसंख्या १६० च्या पुढे गेली.
हैदराबादची प्लेईंग ११ -
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी
दिल्लीची प्लेईंग ११ -
जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकिपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.